नवी दिल्लीः सोशल मीडियावर फोटो शेअरिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या अॅपवर आता एकाचवेळी सहा फोटो शेअर करता येणार आहेत. इन्स्टाग्रामवर एक नवे फीचर युजर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहे. इन्स्टाग्राम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी () अॅडम मॉसरी यांनी ट्विटरवरून या नव्या फिचरची अधिकृत घोषणा केली. नवे फिचर वापरून इन्स्टाग्राम युजर्स एकाचवेळी अनेक फॉरमॅटच्या माध्यमातून शेअर करू शकतात. मात्र, या फॉरमॅटच्या माध्यमातून जास्तीत जास्त सहा फोटो शेअर केले जाऊ शकतात. कंपनीच्या सीईओंनी आपल्या ट्विटर हँडलवरून ग्रीड फॉरमॅटचा वापर करून काढलेले फोटो शेअर केले आहेत. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्राम कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनही या नव्या फोटो फिचरची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे फोटो ग्रीड फॉरमॅटचा वापर करून काढलेले सहा फोटो शेअरही करण्यात आले आहेत. कसे वापराल नवे फोटो ग्रीड फॉरमॅट फिचर कंपनीने या नव्या फिचरला फिचर असे नाव दिले आहे. मोबाइलमधील गॅलरीमध्ये सेव्ह केलेली छायाचित्रांचा वापर करून फोटो ग्रीड फॉरमॅट तयार केला जाऊ शकतो. अन्यथा इन्स्टाग्राम युजर्स इन्स्टा कॅमेराचा वापर करूनही ग्रीड फॉरमॅटमध्ये फोटो तयार करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकापेक्षा जास्त फोटो शेअर करण्यासाठी इन्स्टा यूजर्सना थर्ड पार्टी अॅप वापरावे लागत होते. एकाचवेळी अनेक फोटो अपलोड करण्याची सुविधा इन्स्टाग्रामवर उपलब्ध नव्हती. युजर्सची आवड आणि गरज लक्षात घेता इन्स्टा कंपनी या नव्या फिचरवर काम करत होती. अखेर फोटो ग्रीड फॉरमॅटचे फिचर कंपनीने युजर्ससाठी खुले केले आहे. या आठवड्याच्या अखेरीस इन्स्टाग्रामच्या सर्व युजर्सना नवे फिचर उपलब्ध होणार आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36Qi5Y4
Comments
Post a Comment