जिओ फायबर ग्राहकांसाठी ही आहे 'गुड न्यूज'

नवी दिल्लीः रिलायन्स ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आता १९९ रुपयांच्या टॉप अप व्हाउचर वर १ टीबी म्हणजेच १००० जीबी डेटा ऑफर देऊ केली आहे. आधी या प्लानमध्ये ग्राहकांना केवळ १०० जीबी डेटा मिळत होता. विशेष म्हणजे कंपनीने प्लानच्या वैधतेत कोणताही बदल केला नाही. ६९९ रुपये आणि ८४९ रुपयांचा बेसिक प्लानचा वापर करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. जिओ फायबरला कमर्शल लाँच केल्यानंतर ग्राहकांकडून जो प्रतिसाद मिळायला हवा होता. तो न मिळाल्यामुळे कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही नवी ऑफर देवू केली आहे. मार्केटमध्ये जिओ फायबरची टक्कर एअरटेलच्या ब्रॉडबँड प्लानशी असणार आहे. एअरटेल हैदराबादच्या ग्राहकांना ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड ऑफर मिळत आहे. जिओ फायबर ग्राहकांसाठी ६९९ रुपयांच्या स्वस्त प्लानमध्ये एका महिन्यासाठी १५० जीबी डेटा दिला जात आहे. एअरटेलचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना २९९ रुपयांच्या डेटा अॅड ऑन पॅकवर दर महिन्याला ३.३ टीबी डेटा दिला जात आहे. एअरटेलचे हे दोन्ही प्लान जिओपेक्षा भारी आहेत. त्यामुळेच कंपनीने १९९ रुपयांचा टॉप व्हाऊचरवर १०० जीबी ऐवजी वाढून ते १ टीबी डेटा केले आहे. अनेक ग्राहकांचा या प्लानसंदर्भात गैरसमज होत आहे. हा प्लान टॉप अप व्हाऊचर आहे. कोणत्याही मंथली रेंटलच्या प्लानसोबत सब्सक्राइब केला जाऊ शकतो. म्हणजे, ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी १५० जीबी डेटा देते. डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड कमी होते. त्यात १९९ रुपयाचा टॉप अप पॅक केल्यास पुन्हा एकदा हायस्पीड इंटरनेटची मजा घेता येऊ शकते. या पॅकची वैधता एक आठवडा इतकी आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SJ5YIN

Comments

clue frame