नवी दिल्लीः शाओमीची एमआय १० सीरिज फेब्रुवारी महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी दोन स्मार्टफोन Mi 10 आणि लाँच करण्याची शक्यता आहे. फोन लाँच होण्यास दोन दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. परंतु, या फोनची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. शाओमीचा आगामी Mi 10 Pro हा स्मार्टफोन अवघ्या ३५ मिनिटात फुल चार्ज होवू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. विबोवर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये टिप्स्टर ने म्हटले आहे की, एमआय १० सीरिजच्या टॉप अँड व्हेरियंटसाठी फास्ट चार्जिंगच्या फीचरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जवळपास एक महिन्याआधी चीनच्या ३सी अॅथोरिटीच्या डेटाबेसमध्ये शाओमीचे ५ जी नेटवर्क कनेक्टिविटीचे दोन फोन समोर आले आहे. फॉक्सकॉन मध्ये काम करणाऱ्या काही कामगारांच्या म्हणण्यानुसार, एमआय १० सीरिजचे स्मार्टफोन जे१ आणि जे२ कोडनेम सह यादीत आहे. जे१चे ३सी सर्टिफाईट ५ जी स्मार्टफोन असणार आहे. हा MDY-11-EB चार्जर सह येणार आहे. हे चार्जर म्हणजे ६६ व्होल्टेजचे चार्जर आहे. कंपनी याच फोनला Mi 10 Pro म्हणून लाँच करू शकतात. J2 च्या फोनमध्ये ३० वॉटची फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते. हा शाओमीचा एमआय १० स्मार्टफोन असू शकतो. कंपनी याला चार्जर देणार असून यात आधी Mi CC9 Pro आणि Mi Note 10 मध्ये दिसले आहे. फोनमध्ये कोणत्या साईजची बॅटरी असणार आहे. याविषयी अद्याप काही माहिती समोर आली नाही. या दोन्ही फोनमध्ये स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर देण्यात येणार आहे. या प्रोसेसरमुळे फोनला ड्युअल मोड ५ जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट मिळणार आहे. कंपनी फोनमध्ये १०८ मोगापिक्सलचा कॅमेरा देणार की नाही, हे लाँचच्यावेळी स्पष्ट होईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2tQxHww
Comments
Post a Comment