विवो कंपनी या दोन सीरिजचे फोन बंद करणार

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपले दोन सीरिजचे स्मार्टफोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विवोचे प्रसिद्द झेड आणि यू या दोन सीरिजचे फोन बंद होणार आहेत. कंपनी या दोन्ही फोनचा स्टॉक संपेपर्यंत सेल सुरूच ठेवणार आहे. त्यानंतर या सीरिजचा कोणताही नवीन फोन नवीन वर्षात लाँच करण्यात येणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने नुकतीच या संदर्भात घोषणा केली आहे. २०२० पासून या दोन सीरिजचे कोणतेही नवीन फोन कंपनी लाँच करणार नाही. कंपनीने म्हटले की, भारतात आता स्मार्टफोन केवळ ऑनलाइन सेल्ससाठी लाँच करण्यात येणार नाही. नवीन वर्षात कंपनीने हे नवे धोरण ठरवले आहे. यासंबंधी एक पत्र जारी केले असून या पत्रावर कंपनीचे सीईओ म्हणात, गिऱ्हाईकांना डोळ्यासमोर ठेवून सर्वात पहिले आम्ही हा निश्चय केला आहे की, व्यापारी सहकारी, कर्मचारी आणि शेअर होल्डर्सच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन ऑफलाइन पार्टनर्सला सोबत घेऊन गिऱ्हाईकांचा स्मार्टफोन्सचा अनुभव अधिकाधिक चांगला करण्याचे म्हटले आहे. विवो सोबतच सॅमसंग, ओप्पो आणि रियलमी या कंपनीही भविष्यात आपला स्मार्टफोन्सला ऑफलाइनमध्ये लाँच करतील, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन () ने विवोच्या या निर्णयाचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद दिले आहेत. एका ट्विटद्वारे प्रतिक्रिया देताना म्हटले, आम्ही विवो इंडियाला धन्यवाद देतो आणि अन्यायपूर्ण ई-कॉमर्स ट्रेंड विरुद्ध पाठिंबा देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करीत आहोत. चाल, सोबत मिळून मोबाइल रिटेलर्ससाठी न्यायपूर्ण व्यापार करण्यासाठी बदल करूयात. विशेष म्हणजे विवो कंपनी लवकरच एस१ प्रो भारतात लाँच करणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39v6wrF

Comments

clue frame