नवी दिल्ली: यूजर्सचा डेटा लीक होण्याच्या प्रकारांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि बँकिंगसारख्या ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या प्रकारांमध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांसाठी यूजर्सचा डेटा अतिशय किंमती असत. हा टेडा विकून ठग करोडो रुपयांची कमाई करत असतात. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, केवळ हँकिंगच्या माध्यमातून डेटा लिक केला जातो. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. अनेकदा सिस्टममधील त्रुटी आणि सर्व्हर सुरक्षित नसल्याने देखील डेटा चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचत असतो. पाहुयात, या वर्षी (२०१९) झालेल्या डेटा लिक होण्याच्या मोठ्या घटना कोणत्या आहेत.... या घटनांमुळे यूजर्सचे मोठे नुकसान झाले आहे. एसबीआयचा ४० कोटी रुपयांहून अधिक यूजर्सचा डेटा झाला लिक देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या तब्बल ४२. २ कोटी यूजर्सचा डेटा लीक होण्याची घटना घडली आहे. असुरक्षित सर्व्हर हे यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. हे यूजर्स क्विक सर्व्हिसचा वापर करत होते. ही घटना डिसेंबर २०१८ ते जानेवारी १०१९ या कालावधीत घडली. यात यूजर्सचे फोन नंबर, बँक अकाउंट नंबर, बँक बलेन्स आणि रिसेंट ट्रान्झॅक्शनबाबतची माहिती लिक झाली होती. डार्कवेबवर झाली डेटाबेसची सर्वात मोठी विक्री ऑक्टोबर महिन्यात डार्कवेबवर भारतीय बँकांच्या १३ लाख क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती विक्रीसाठी उपलब्ध होती. हा डेटा १०० डॉलर प्रति कार्डच्या हिशोबाने विकला जात होता, अशी माहिती सिंगापूरच्या एका सायबर सेक्युरिटी कंपनी ग्रुप आयबीने माहिती देताना सांगितले. डार्कलवेबवर या कार्डची माहिती २८ ऑक्टोबर २०१९ ला प्रसिद्ध करण्यात आली होती. भारतीय हेल्थकेअर वेबसाइटवर झाला हल्ला फेब्रुवारी २०१९ मध्ये 'fallensky519' नावाच्या एका हॅकरने भारतीय हेल्थकेअर वेबसाइटवर हल्ला करत ६८ लाख यूजर्सचा डेटा चोरला. १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान झालेल्या या चोरीमध्ये यूजर्सची व्यक्तीगत माहितीशी संबंधित डेटा लिक करण्यात आला. याबरोबरच जस्ट डायलच्या एकूण १० कोटी यूजर्सची नावे, नंबर आणि पत्ते लिक करण्यात आले होते. तसेच डेटिंग अॅप असलेल्या ग्रिंडर या अॅपचे सुमारे ३० लाख यूजर्सचा डेटा लिक करण्यात आला होता. याबरोबरच फेसबुकच्या सुमारे ६० कोटी यूजर्सचा डेडा लिक झाल्याची घटनाही घडली आहे. सन २०१२ पासूनचे फेसबुकच्या सर्व्हरमधील सेव्ह केलेले पासवर्ड लिक करण्यात आले. ही घटना फेसबुकचे सर्व्हर असुर्क्षित असल्याने असे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बरोबरच थर्ड पार्टी अॅपद्वारेही आणि ट्विटरच्या यूजर्सचा डेटा लिक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबरच भारतातील सर्वात मोठा वीज प्रकल्प आणि देशातील सर्वात मोठी स्पेस एजन्सीही सप्टेंबर महिन्यात हॅकर्सची शिकार झाली आहे.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EHR9xT
Comments
Post a Comment