नवी दिल्ली : Z पिढीचे टिनेजर्स (१९९५ ते २०१९ या वर्षातील जन्म) वातावरण बदल हा आपल्या पिढीचा सर्वात मोठा मुद्दा असल्याचं सांगतात. ही पिढी यावर फक्त आवाजच उठवत नाही, तर डेटिंग अॅप्सवरही याची चर्चा होत आहे. प्रसिद्ध डेटिंग अॅप टिंडरने जनरेशन झेडवर फोकस करत इयर-इन-इयर रिव्हूय रिपोर्ट जारी केला आहे. झेड पिढीमध्ये वातावरण बदल, पर्यावरण आणि सामाजिक न्याय हे सर्वात प्रसिद्ध शब्द असल्याचं अहवालात म्हटलं आहे. २०१९ या वर्षात टिंडरवर झेड जनरेशनचाच दबदबा राहिला. डेलॉयटच्या २०१८ च्या रिपोर्टमध्येही अशाच शब्दांचा परिणाम समोर आला होता. या रिपोर्टनुसार, ७७ टक्के झेड पिढी समाजाविषयी जागरुक आहे. ७७ टक्के झेड पिढीला आपल्या विचारांशी साधर्म्य असलेल्या संस्थेत काम करण्याची इच्छा आहे. या पिढीचा दृष्टीकोन फक्त व्यावसायिक आयुष्याशी संबंधित नाही. आपल्या रोमँटिक पार्टनरलाही समाजाविषयी जाण असावी, असं या पिढीला वाटतं. टिंडरच्या या रिपोर्टनुसार, झेड पिढी आपलं काम किंवा ध्येय याचा उल्लेख करणं जास्त पसंत करते. तर तरुण तीन पट जास्त ट्रॅव्हलिंगचा उल्लेख करतात. बिझनेस इनसायडरच्या वृत्तानुसार, इतर पिढ्यांच्या तुलनेत ही युवा पिढी किती तरी पैसा फिरण्यावर खर्च करते. याशिवाय कंपनी आपल्या कामाची जाणिव ठेवते का याचीही काळजी ही पिढी घेते. आपल्या पगारातून दररोजचा आणि फिरण्याचा खर्च व्हावा ही युवा पिढीची किमान अपेक्षा असते. इनसाईडहूकच्या वृत्तानुसार, तरुणांमधील टॉप ट्रेडिंग टर्म्समध्ये रिअल, लिट, स्टॅन आणि टी हे शब्द राहिले. तरुणांच्या तुलनेत झेड पिढी किती तरी अधिक समाज न्याय प्रिय आहे, असंही बिझनेस इनसायडरच्या २०१८ च्या सर्व्हेमध्ये समोर आलं.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QAUzI1
Comments
Post a Comment