नवी दिल्लीः टाटा स्काय () ने आपल्या ग्राहकांनासाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना काही निवडक प्रादेशिक चॅनेल आणि मेट्रो चॅनेलचे कमी पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे जी, सोनी आणि स्टार यासारख्या कंपन्यांनी २६ चॅनेलची किंमत कमी केली आहे. याआधी टाटा स्कायने दिवाळीनिमित्त चॅनेलच्या दरात कपात केली होती. टाटा स्कायने झी टीव्ही, झी मराठी, झी सार्थक, झी बांगला, झी तेलुगु, झी कन्नड, एशियंट मुव्हीज, एशियंट, स्टार मा, नॅशनल जॉग्राफी, स्टार जैशा, स्टार स्पोर्ट्स २, स्टार प्लस, स्टार विजय, स्टार स्पोर्ट्स ३, विजय सुपर, सेट, हंगामा टीव्ही, सोनी सब, कलर्स, कलर्स कन्नड, सोनी मॅक्स, स्टार स्पोर्ट्स १, झी तमीळ, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, नॅट जिओ वर्ल्ड या चॅनेलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत चॅनेल पाहण्यासाठी १४.१६ (टॅक्स सह) प्रती महिना द्यावे लागणार आहे. ऑफर संपल्यानंतर या पॅकची किंमत २२.४२ रुपये असणार आहे. परंतु, टाटा स्कायने आतापर्यंत या ऑफरची कधीपर्यंत असणार याविषयी अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. टाटा स्कायच्या प्लेटफॉर्मवर ग्राहकांसाठी ५८५ एचडी आणि एसडी चॅनेल आहेत. तसेच कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी जास्त सुविधा देण्यसाठी जी, स्टार, सन, सोनी आणि टाइम्स यासारख्या कंपन्यासोबत करार केला आहे. काही दिवसापूर्वी टाटा स्कायने रिलायन्स जिओ, एअरटेल आणि डिश टीव्हीला टक्कर देण्यासाठी अँड्रॉयड टीव्ही सपोर्ट करणाऱ्या सेट टॉप बॉक्स बाजारात आणले होते. कंपनीने ग्राहकांसाठी सेट टॉप बॉक्स मध्ये ओटीटी अॅप्स अॅक्सेस दिला होता. परंतु, ओटीटी अॅप्सचा वापर करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे होते.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35YKknF
Comments
Post a Comment