नो​कियाचा सेल सुरू, ग्राहकांना मिळणार ही ऑफर

नवी दिल्लीः नोकियाचा लेटेस्ट बजेटमधील स्मार्टफोन चा भारतात सेल सुरू झाला आहे. ग्राहकांना हा फोन , ई शॉप, अधिकृत रिटेल स्टोर्स, क्रोमा, रिलायन्स, संगीता, पूर्विका, बिग सी आणि मायजी या वरून खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आहे. या फोनची किंमत ८ हजार १९९ रुपये आहे. तसेच चारकोल, स्यान आणि सँड या तीन रंगात उपलब्ध आहेत. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना कंपनीने फोनची गॅरंटी दिली आहे. ३१ मार्च पर्यंत हा फोन खरेदी केल्यास फोनमध्ये काही हार्डवेअर अडचण आली किंवा मोबाइल खराब झाल्यास कंपनी नवीन मोबाइल ग्राहकांना देणार आहे. या फोनमध्ये ग्राहकांना अॅक्सेसरी आणि सॉफ्टवेअरसह ६ महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. तसेच नोकिया २.३ फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जिओ ग्राहकांना ७,२०० रुपयांचा फायदा मिळणार आहे. यासाठी २४९ रुपये आणि ३४९ रुपयांचा प्रीपेड प्लान रिचार्ज करावा लागणार आहे. जिओकडून २२०० रुपयांचा कॅशबॅक सुद्धा दिला जाणार आहे. जुमकारकडून २ हजार तर क्लिअरट्रिपकडून ३ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या फोनची वैशिष्ट्ये नोकियाच्या या फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये अँड्रॉयड ९ वर काम करतो. तसेच या फोनमध्ये अँड्रॉयड १० चे अपडेट लवकरच मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. फोनमध्ये ड्युअल सीम कार्डचे स्लॉट दिले आहे. नोकियाच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅश सह ड्युअल कॅमेराचा सेटअप दिला आहे. १३ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या साहायाने ४०० जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QoiIl1

Comments

clue frame