युजर्सची हेरगिरी; अॅपलने हटवले हे अॅप

नवी दिल्लीः अॅपलने आपल्या अॅप स्टोअरवरून युएईचे ToTok हे चॅटिंग अॅप हटवले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानंतर हे अॅप हटवण्यात आले. ToTok या अॅपवरून हेरगिरी करण्यात येत होती, असं न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटलं होतं. ToTok हे अॅप व्हॉट्सअॅपसारखे आहे. यावरून इन्स्टंट मेसेज आणि व्हिडिओ कॉल करता येतो. ToTok ह्या अॅपवरून युनायटेड अरब अमीरातचे ( युएई) सरकार युजर्सची हेरगिरी करत होते. आखाती देश, युरोप, आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील लाखो युजर्स या अॅपचा वापर करतात. हे अॅप युजर्सचा संवाद, हालचाल, ठिकाण, आवाज आणि फोटो ट्रॅक करत होते, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने न्यूयॉर्क टाइम्सा दिली. अमेरिकेत अलिकडेच सर्वांत जास्त डाउनलोड केल्या गेलेल्या अॅपमध्ये ToTok चाही समावेश आहे. या अॅपचे युएईमध्ये हजारो युजर्स आहेत, अशी माहिती अॅप रिसर्च कंपनी App Annie ने दिलीय. हे Breej Holding ने डेव्हलप केले आहे. Breej Holding ही कंपनी आबू धाबीतील कंप्युटर इंटेलिजन्स आणि हॅकींग कंपनी DarkMatter शी संबंधित आहे, असं न्यूयॉर्क टाइम्सच्या तपासात समोर आलंय. प्ले स्टोअरवरूनही हटवले अॅप युएईचे गुप्तचर अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे माजी कर्मचारी आणि इस्राइलच्या लष्कराचे गुप्तचरही या DarkMatter कंपनीत आहेत, असा दावा न्यूयॉर्क टाइम्स आपल्या वृत्तात केलाय. गुगलनेही हे अपॅ आपल्या प्ले स्टोअरवरून अँड्राइड युजर्ससाठी हटवले आहे. ToTok हे अॅप हटवण्यात आले आहे आणि या प्रकरणी चौकशी सुरू आहे, असं अॅपच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलंय.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EOlvik

Comments

clue frame