तब्बल ५७०० वर्षांपूर्वीच्या मानवाचा डीएनए मिळविण्यात डेन्मार्कच्या शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. भोजपत्राच्या झाडाच्या राळेचा उपयोग त्याकाळी च्युईंग गमसारखा केला गेल्याची बाबही उघड झाली आहे.
सध्या बाजारात अनेक प्रकारचे व अनेक चवींचे च्युईंग गम बाजारात उपलब्ध आहेत. काही जण तोंडाला व्यायाम म्हणून, तर काही जण फॅशन म्हणून च्युईंग गम चघळत बसतात. या च्युईंग गमचे धागेदोरे थेट पाषाण युगापर्यंत जाऊन पोचले आहेत. मानवी उत्क्रांतीचा इतिहास जेवढा क्लिष्ट आहे, तेवढाच तो रोचकही आहे. पाषाण युगात जगाच्या वेगवेगळ्या भागात मानवी वस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या सगळ्यांच्या जीवनपद्धतीतील साम्य व फरक शोधण्याच्या प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याच शोधातील आणखी एक पाऊल टाकले गेले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भोजपत्राच्या झाडाची राळ काढून तिचा उपयोग कदाचित च्युईंग गम सारखा केला जात होता. पाषाण युगातील असा एक नमुना मिळविण्यात डेन्मार्कच्या संशोधकांना यश मिळाले आहे. त्या च्युईंग गमच्या साह्याने त्या पाषाण युगीन मानवाचे लिंग कोणते होते व त्याने शेवटी काय खाल्ले होते याचीही मिळविली आहे. इतकेच नव्हे, तर या व्यक्तीच्या तोंडात कोणत्या प्रकाराचे जंतू होते याचाही शोध शास्त्रज्ञांनी लावला.
मानवी हाडांशिवाय प्राचीन मानवाचा जनुकीय आराखडा तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी प्रतिक्रिया कोपनहेगन विद्यापीठातील संशोधक हान्स श्रोडर यांनी व्यक्त केली. श्रोडर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. दक्षिण डेन्मार्कमधील सिल्थोल्ममध्ये खोदकाम करत असताना संशोधकांना अनेक अवशेष मिळाले. याता काही अवशेष झाडांचे अवशेष, तसेच आक्रोडाचे तुकडे तसेच भोजपत्राची राळ मिळाली. तसेच एका बदकाचे जीवाश्मही सापडले. या सर्व गोष्टी घट्ट जमिनीमध्ये गाडले गेले होते. त्यामुळे ते शाबूत होते. ज्या भागात उत्खनन करण्यात आले त्या भागात कधी काळी मानवी वस्ती होती असे मानले जात होते. परंतु, त्या भागात उत्खनन फारसे झाले नव्हते.
भोजपत्रापासून मिळणारी राळ त्याकाळी चघळत होते. डिंक तयार करण्यासाठी ती राळ चघळली जात असावी किंवा दात स्वच्छ करण्यासाठी त्याचा च्युईंग गमसारखा उपयोग केला जात असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे.
या राळेचा संशोधकांनी अभ्यास केला. त्यातून त्यांना आश्चर्यकारक माहिती मिळाली. ती राळ चावणारी एक महिला होती. त्या राळेतील अवशेषांच्या साह्याने डीएनए वेगळा करण्यात संशोधकांना यश आले. त्याच्या आधारे त्यांनी त्या मानवाचा जनुकीय आराखडा तयार केला. तेला ती महिला होती, तिचे केस व त्वचा काळी होती. तिचे डोळे निळे होते, अशी माहिती संशोधकांनी मिळविली. ही राळ ५७०० वर्षांपूर्वीची होती. त्या पाषाण युगीन महिलेचे नाव संशोधकांनी लोला असे ठेवले आहे. त्या राळेतून एपस्टाईन-बार विषाणू संशोधकांना मिळाला. सुमारे ९० टक्के प्रौढांमध्ये याचा संसर्ग होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्या शिवाय आक्रोड आणि बदकाची जनुकेही राळेतून मिळाली. याचा अर्थ लोलाने या दोन्ही गोष्टींचे सेवन केलेले असू शकते, असे संशोधकांना वाटते. लोलाचा आहार कसा होता आणि कोणते जंतू तिच्या तोंडात होते, याचीही माहिती मिळाल्याने हजारो वर्षांच्या कालावधीत सूक्ष्म जंतूंमध्ये काय बदल झाले आणि भविष्यात काय बदल होऊ शकतात याचा अभ्यास या नमुन्यांच्या आधारे करता येणार आहे.
ज्या ठिकाणाहून हे अवशेष मिळाले, ती जागा ही पाषाण युगातील सर्वाधिक नमुने असलेली डेन्मार्कमधील जागा आहे. लोला ज्या ठिकाणी राहत होती, त्या ठिकाणचे लोक प्रामुख्याने मासेमारी आणि शिकार करत होते. लोलाची जी माहिती मिळाली त्यावरूनही त्या भागात लोकांची उपजीविका शेतीवर नव्हे, शिकार करून त्यांची उपजीविका होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. लोलाच्या शरीरात दुग्धशर्करेचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून आले. प्राणी पाळायला लागल्यानंतर आणि त्यांचे दूध पिण्यास सुरवात केल्यानंतर मानवाच्या शरीरातील दुग्धशर्करेचे प्रमाण वाढल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्या शिवाय उत्तर युरोपातील लोकांच्या त्वचेचा रंगही पाषाण युगात आतापेक्षा वेगळा होता. कमी सूर्यप्रकाश मिळाल्याने तो बदलत गेला. अनेक पुरातत्त्व जागांवर भोजपत्राची राळ सापडते. या राळेतून नवे पुरावे मिळाल्याने पुरातत्त्व संशोधकांना आता संशोधनाचे एक नवे दालन खुले झाले आहे.

from News Story Feeds https://ift.tt/354yery
Comments
Post a Comment