हरवलेला मोबाइल आता या वेब पोर्टलवरून शोधा

नवी दिल्लीः वाढत्या आर्थिक गुन्हेगारी आणि फसवणुकीमुळे मोबाइल फोन चोरीला गेल्यास मोठे संकट उभे राहू शकते. मोबाइल फोन चोरीला गेल्यानंतर कुणाचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारने पावलं उचलली आहेत. सरकारने एक लाँच केले आहे. या वेब पोर्टलच्या साहायाने चोरी गेलेला मोबाइल शोधता येऊ शकणार आहे. यांच्या हस्ते या वेब पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे. या वेब पोर्टलचा फायदा दिल्ली-एनसीआर आणि मुंबईतील लोकांना होणार आहे. सप्टेंबर महिन्यात या सिस्टमची चाचणी करण्यात आली होती. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स () ने हे वेब पोर्टल तयार केले आहे. हे विकसीत करण्यासाठी दिल्ली पोलीस आणि डिपार्टमेंटल ऑफ टेलिकॉमने सीडीओटीची मदत केली आहे. या प्रोजेक्टची चाचणी याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात आली होती. हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाइल शोधण्यासाठी सेंट्रल रजिस्ट्री सिस्टम तयार करण्यात आली आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे देशातील सर्व ऑपरेटर्सच्या आयएमईआय डेटा बेसशी कनेक्ट करण्यात आले आहे. टेलिकॉम ऑपरेटर सीआयआरमध्ये आपल्या नेटवर्कमधून सर्व युजर्सच्या मोबाइल फोनचा डेटा शेअर केला जातो. त्यामुळे चोरी गेलेला किंवा हरवलेला कोणत्याही फोनचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेतली जाते. असा शोधा चोरी गेलेला मोबाइल >> सर्वात आधी आपला मोबाइल फोन चोरी किंवा हरवल्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करा >> नंबर ब्लॉक झाल्यानंतर एफआयआरची कॉपी आणि आयडी पुराव्यासह सीमकार्डवरून अर्ज करा >> आता फोनमधील आयएमईआय नंबरला ब्लॉक करण्यासाठी वर जा >> या पोर्टलवर तुम्हाला नोंदणी फॉर्म भरावा लागेल >> त्यानंतर एक विनंती आयडी पाठवावी लागेल >> या विनंती आयडीचा वापर तुम्ही मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासाठी करू शकता >> मोबाइल फोन मिळाल्यानंतर आयएमईआयला अनब्लॉक करून फोन पुन्हा चालू करू शकता


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2sq7x3C

Comments

clue frame