मीडिया टेकनं लाँच केला पहिला ५जी प्रोसेसर

नवी दिल्लीः चिपमेकर मीडियाटेकनं कंपनीचा पहिला ५जी मोबाइल प्रोसेसर लाँच केला असून डायमेनसिटी १००० ५जी असं या प्रोसेसरचं नाव आहे. ही नवी चिपसेट प्रिमीयम आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी खास तयार करण्यात आलं आहे. डायमेनसिटी चिपसेटसोबत येणारा स्मार्टफोन २०२०पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. मीडियाटेकचा १००० ५जी प्रोसेसर जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या चीपच्या मदतीने ४.७जीबीपीएसची डाउनलिंक आणि २.५ जीबीपीएसची अपलिंक स्पीड ६एचझेडच्या नेटवर्कसोबत देण्यात येणार आहे. तसंच, ही चिपसेट २ जी ते ५ जीपर्यंत कनेक्टिव्हीटीसाठी मल्टी-मोड सपोर्ट देण्यात आला आहे. गेमिंग परफॉर्मन्स ही जगातील सर्वात पहिली आर्म माली जी७७ जीपीयूसोबत येणारा ही पहिली चिपसेट आहे, ज्यामुळं ५जी स्पीडवर उत्कृष्ट गेमिंग परर्फोमन्स युजर्सना मिळणार आहे. ८० एमपीपर्यंत कॅमेरा सपोर्ट ५जी-कोर इमेज सिग्नल प्रोसेसर(आयएसपी)ला मीडियाटेकची Imagiq+ प्रोसेसरसोबत जोडण्यात आलं आहे. ही चिपसेट ८० मेगापिक्सल कॅमेरा सेंसर २४ फ्रेम प्रति सेकेंद आणि ३२+१६ मेगापिक्सल ड्यूएल कॅमेरा सारख्या मल्टी कॅमेरा पर्याय आहेत. तसंच, पहिल्यांदाच मल्टी-फ्रेम व्हिडिओ एचडीआर कॅपेबिलिटीसोबत देण्यात आली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37jap0C

Comments

clue frame