विवोचे दोन जबरदस्त स्मार्टफोन बाजारात

नवी दिल्ली: विवो कपनीने आपल्या एक्स-सिरीज अंतर्गत आणि हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. 'विवो एक्स३०' आणि 'विवो एक्स३० प्रो' हे दोन्ही 5G फोन आहेत आणि Exynos ९८० प्रोसेसर असलेले स्मार्टफोन आहेत. 'विवो एक्स३०' आणि 'विवो एक्स३० प्रो' दोन्ही केवळ कॅमेऱ्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये वेगळे आहेत. दोन्ही फोनची इतर वैशिष्ट्ये मात्र समान आहेत. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ८ जीबी रॅम + १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजसह देण्यात आले आहे. 'विवो एक्स३०' आणि 'विवो एक्स३० प्रो' ची इतकी आहे किंमत 'विवो एक्स३०' आणि 'विवो एक्स३० प्रो' स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लॉन्च झाले आहेत. वीवो एक्स 30 प्रो हा अधिक शक्तिशाली फोन आहे आणि त्याची किंमतही जास्त आहे. या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत ३९९८ युआन (सुमारे ४०,५०० रुपये) इतकी आहे. ही किंमत ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची आहे. त्याच वेळी, त्याच्या टॉप-एंड मॉडेलची किंमत ४,३०० युआन (सुमारे ४३,६०० रुपये) इतकी आहे. तर, विवो एक्स 30 ची सुरुवातीची किंमत ३.२९८ युआन (सुमारे ३३,४०० रुपये) इतकी आहे. ही किंमत ८ जीबी रॅम + १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या मॉडेलची आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप-एंड मॉडेलची (८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज) किंमत ३,५९८ युआन (सुमारे ३६,४०० रुपये) इतकी आहे. या स्मार्टफोनची ही आहेत वैशिष्ट्ये 'विवो एक्स३०' आणि 'विवो एक्स३० प्रो' या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. त्याला विवोने एक्सडीआर डिस्प्ले असे नाव दिले आहे. कंपनीचा असा दावा आहे की, त्याची पीक ब्राइटनेस १२०० निट्स आहे. डिस्प्लेमध्ये ३२ मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा आहे. विवोचे या दोन्ही स्मार्टफोनमध्ये सॅमसंगच्या एक्सीनोस ९८० प्रोसेसर देण्यात आले आहेत. या प्रोसेसरना ५जी चा सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ४,३५० एमएएच बॅटरी आहे. ही बॅटरी ३३ डब्ल्यू फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. दोन्ही स्मार्टफोन एंड्रॉइड ९.० पाईवर आधारित फंटचॉच १० वर चालतात. दोन्ही स्मार्टफोनच्या मागील भागामध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा विवो एक्स ३० प्रो मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा आहे. या व्यतिरिक्त, स्मार्टफोनमध्ये १३ एमपी पेरिस्कोपिक टेलिफोटो सेन्सर आहे, जो ५ एक्स हायब्रीड आणि ६० एक्स डिजिटल झूम देतो. फोनच्या मागील बाजूला ३२ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सलचे सेन्सरसुद्धा दिले आहेत. त्याचबरोबर, 'व्हिवो एक्स ३०' मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देखील देण्यात आला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Pu9chi

Comments

clue frame