शाओमीचा उद्यापासून सेल; ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स मिळणार

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपल्या ग्राहकांसाठी 'नंबर वन मी फॅन सेल' ची घोषणा केली आहे. उद्यापासून हा सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स मिळणार आहेत. १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. शाओमीची वेबसाइट, एमआय होम स्टोर्स, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि अधिकृत रिटेल आउटलेट्सवरून ग्राहकांना या सेलमध्ये आवडता स्मार्टफोन्स खरेदी करता येऊ शकणार आहे. 'नंबर वन मी फॅन सेल' ची सुरुवात १९ डिसेंबर रोजी होईल. तसेच स्पेशल सेलची घोषणा सुद्धा याच दिवशी होणार आहे. अॅक्सेसरीज आणि स्मार्ट होम प्रोडक्ट्स साठी फ्लॅश सेलचे आयोजन करण्यात येणार असून ते केवळ सकाळी १० वाजता, दुपारी ४ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता सुरू राहणार आहे. हे केवळ २३ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या सेल दरम्यान बँकिंग डिस्काउंट, कॅशबॅक, ऑफर्स आणि नो कॉस्ट ईएमआयचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. या सेलमध्ये शाओमीचे फोन स्वस्तात मिळणार आहेत. रेडमी के २० प्रो हा फोन ग्राहकांना २४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसेच यावर २ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकणार आहे. रेडमी नोट ७ प्रो हा फोन ९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकणार आहे. तसे १ हजार रुपयांचा एक्सचेंज डिक्साउंट ग्राहकांना मिळणार आहे. रेडमी ७ ए, रेडमी के २०, पोको एफ१ आणि शाओमी एमआय ए३ या फोन्सवरही मोठा डिस्काउंट कंपनी देणार आहे. स्मार्टफोन्स शिवाय कंपनी या सेलमध्ये अनेक अॅक्सेसरीज उदा. एमआय स्मार्ट बल्ब, एमआय स्पोर्ट्स ब्लूटूथ, इअरफोन बेसिक आणि एमआय बँड ३ वर ऑफर्स देणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36RaQiS

Comments

clue frame