नवी दिल्ली: आणि वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. नवीन वर्षात टीव्ही पाहणे तुलनेने खूपच स्वस्त होणार आहे. टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दूरसंचार क्षेत्रात अनेक बदल केल्यानंतर आता प्रसारण क्षेत्रात नवीन नियम लागू करण्याबरोबरच जुन्या शुल्कामध्ये सुधारणा करण्याचीही तयारी सुरू केली आहे. ही सुधारणा झाल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. यावर्षी एप्रिलमध्ये ट्रायने डीटीएच आणि केबल टीव्ही ग्राहकांसाठी शुल्काबाबत नवीन नियम लागू केले होते. मात्र, वापरकर्ते या नियमांमुळे काहीसे नाराज झाले होते. या नव्या नियमांमुळे टीव्ही पाहणे पूर्वीपेक्षा खूपच महाग झाले आहे. नेटवर्क कॅपेसिटी फी (एनसीएफ) मधील बदल हे दर महाग होण्यामागचे कारण होते. एनसीएफ स्वस्त होईल आता डीटीएच आणि केबल टीव्ही ग्राहकांना १५३ रुपये एनसीएफ द्यावा लागणार आहे. एनसीएफ हा वापरकर्त्याने फ्री टू एअर चॅनेलचे किती सबस्क्रिप्शन घेतले आहे यावर देखील अवलंबून असते. या बरोबरच a-la-carte (स्वतंत्रपणे निवडलेले) चॅनेल देखील आता अधिक महाग झाले आहेत. ट्राय आता हे कमी करण्याचा विचार करीत आहे. वापरकर्त्यांना केबल टीव्ही किंवा डीटीएच सबस्क्रिप्शनसाठी जास्त पैसे खर्च करावे लागू नये हा या मागील उद्देश आहे. कंटेट शुल्क भरावे लागेल यावेळी, टीव्ही पाहण्यासाठी वापरकर्त्यांना दोन प्रकारची बिले द्यावी लागतात. त्यात प्रथम एनसीएफ शुल्क आणि दुसरे कंटेंट शुल्क आहे. वापरकर्त्याने दिलेले एनसीएफ शुल्क टीव्ही चॅनेलच्या ब्रॉडकास्टरच्या खात्यावर जमा होईल. एनसीएफ शुल्क हे डीटीएच किंवा केबल ऑपरेटरला चॅनेल दाखवण्यासाठी दिले जाते. यात वापरकर्त्यांना १०० वाहिन्यांसाठी १५३ रुपये दरमहा द्यावे लागतात. वापरकर्त्याची निवड व उपलब्ध डेटा यावर ठरते एनसीएफ ट्रायच्या नवीन कन्सल्टेशन पेपरमध्ये नवीन दर नियमात बदल करण्याबाबतचा मुद्दा मांडण्यात आला आहे. टिव्ही वापरकर्त्यांसाठी टीव्ही पाहणे स्वस्त व्हावे हा ट्रायचा प्रयत्न आहे. यासाठी ट्रायने व्हेरिएबल एनसीएफ आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. व्हेरिएबल एनसीएफ प्रत्येक सर्कलसाठी भिन्न असेल. एनसीएफ हे वापरकर्त्याची निवड आणि उपलब्ध डेटा यावर देखील निश्चित केला जाणार आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3580hq8
Comments
Post a Comment