'हे' आहेत २०१९ मधील भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स

नवी दिल्लीः २०१९ या वर्षांत स्मार्टफोन्सच्या क्षेत्रात अनेक मोबाइल बाजारात दाखल झाले. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन्स आता मिनी कंम्प्युटरचे स्वरुप धारण केले आहे. मोबाइल कंपन्यांतील चढाओढीमुळे ग्राहकांना उत्तम स्पेसिफिकेशनचे मोबाइल स्वस्तात उपलब्ध झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मोबाइल कंपन्यांमधील स्पर्धा आणखीन तीव्र होताना आगामी वर्षात पाहायला मिळेल. पाहूया या वर्षांत धूमाकूळ घातलेले टॉप टेन स्मार्टफोन्स... अॅपल ११ प्रो मॅक्स अॅपल कंपनीच्या आयफोनची क्रेझ संपूर्ण देशभरात आहे. नव्या आयफोन लॉन्चची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे आयफोन स्मार्टफोन इतर ब्रॅण्डपेक्षा वेगळे ठरतात. आयफोन ११ प्रो मॅक्समध्ये ए१३ बायोनिक चिप आणि आयओएस १३ या प्रणाली देण्यात आली आहे. ६.५ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले या फोनमध्ये देण्यात आला असून, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड, १२ मेगापिक्सल टेलिफोटो आणि १२ मेगापिक्सल वाइड, असा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ७ टी प्रो अल्पावधीतच स्मार्टफोन्सच्या दुनियेत आपला दबदबा निर्माण केलेल्या वन प्लसने २०१९ मध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन्स बाजारात लॉन्च केले. त्यापैकी वन प्लस ७ टी प्रो स्मार्टफोन्स आपल्या दमदार स्पेसिफिकेशन्समुळे गाजला. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी मेमरी स्टोरेजसह येणाऱ्या या स्मार्टफोनला ६.६७ इंचाचा फ्युइड अॅमोएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पॉप अप सेल्फी कॅमेरा हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणता येईल. गॅलेक्सी नोट १० प्लस सॅमसंगने गॅलेक्सी नोट सीरिजमधील गॅलेक्सी नोट १० प्लस २०१९ मध्ये बाजारात लॉन्च केला. झुम ऑडिओ हे या स्मार्टफोनचे एक्सक्लुझिव्ह फिचर म्हणता येईल. या स्मार्टफोनला ६.८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून, ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रियल मी एक्स रियल मी एक्स हा मिड रेंज फ्लॅगशिप स्मार्टफोन बाजारात लॉन्च करण्यात आला होता. ६.५ इंचाच्या डिस्प्लेसह १२८ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनलाही पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. वन प्लस ७ प्रो वन प्लसची ७ सीरिज अनेक वैशिष्ट्यांमुळे गाजली. वन प्लस ७ प्रो लॉन्चवेळी सर्वांत महागडा स्मार्टफोन ठरला. या फोनचे बेस व्हेरिअंट ४८,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. या स्मार्टफोनमध्ये ४ हजार एमएएच बॅटरीसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस १० प्लस सॅमसंग गॅलेक्सी एस १० प्लस डिझाइन, डिस्प्ले क्वालिटी, परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर डिझाइनमुळे वेगळा ठरला. गुगल पीक्सल एक्सएल या स्मार्टफोनच्या तुलनेत या स्मार्टफोनचा कॅमेरा उजवा ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हा मोबाइल ७३,९०० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. आयफोन एक्सएस मॅक्स आयफोन एक्सचे पुढील व्हर्जन म्हणून या स्मार्टफोनकडे पाहिले जाते. डिझाइन आणि परफॉर्मन्समुळे हा स्मार्टफोन वैशिष्ट्यपूर्ण ठरला. ६.५ इंचाचा डिस्प्ले, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह हा स्मार्टफोन एक लाख ९ हजार ९०० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. गुगल पीक्सल ३ एक्सएल गुगलने स्मार्टफोन निर्मितीत प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अद्ययावत तंत्रज्ञान आणि गुगलचा थेट सपोर्ट हे गुगलच्या स्मार्टफोन्सचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गुगल पीक्सल ३ एक्सएल या स्मार्टफोनची विक्री किंमत ८३ हजार रुपये आहे. या मोबाइलला केवळ एकच कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. गुगलचा हा फ्लॅगशिप फोन मानला जातो. ६.३ इंचाच्या डिस्प्लेसह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज या स्मार्टफोनला देण्यात येते. वन प्लस ६ टी वन प्लस ६ टी स्मार्टफोन ३७ हजार ९९९ रुपयांना भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. वन प्लसचा फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणून याकडे पाहिले जाते. ६.४ इंचाच्या डिस्प्लेसह ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज यात देण्यात आले आहे. मेट २० प्रो हुवाई कंपनीने भारतात अनेकविध स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. ६.३ इंच डिस्प्ले, ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप यांसह विविध वैशिष्ट्ये या स्मार्टफोनमध्ये सामावलेली आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QauOQ4

Comments

clue frame