जगभरात 'या' पाच स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री

नवी दिल्लीः २०१९ वर्ष हे स्मार्टफोन विक्रीसाठी जबरदस्त राहिले आहे. जगभरात मोजक्याच स्मार्टफोनचा दबदबा राहिला आहे. यात सर्वाधिक फोनच्या विक्रीत अॅपल, सॅमसंग आणि ओप्पोने बाजी मारली आहे. विक्रीत सर्वात वरच्या क्रमांकावर अॅपलचा आयफोन एक्सआर तर दुसऱ्या नंबरवर आयफोन ११ हे दोन स्मार्टफोन राहिले आहे. काउंटर प्वॉइंटच्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. ६४ जीबीच्या या फोनची किंमत ४७ हजार ९०० रुपये आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम ड्युअल स्टँडबाय, ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. याचे रिझॉल्यूशन ८२९ X १७९२ पिक्सल आहे. या फोनमध्ये ३ डी टचऐवजी हॅप्टिक टच दिला आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. अॅपलने सप्टेंबर महिन्यात आयफोन ११ लाँच केला होता. काही दिवसात हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला होता. या फोनची किंमत ६४ हजार ९९० रुपये इतकी होती. फोनमध्ये ६.१ इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. यात ए१३ बायोनिक प्रोसेसर आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. १२ मेगापिक्सलचा वाइड अँगलचा अपर्चर आहे. तर दुसरा १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल फोन आहे. सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या फोनमध्ये या फोनचा समावेश आहे. या फोनची किंमत ८ हजार ४९० रुपये आहे. यात ६.२ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी डिस्प्ले सह ऑक्टाकोर ७८८४ प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम सह ३२ जीबी चा स्टोरेज आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. ड्युअल सिम सपोर्ट सह ३४०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. Samsung Galaxy A50 सर्वात जास्त विकला जाणाऱ्या फोनमध्ये गॅलेक्सी ए५० चा समावेश आहे. या फोनची किंमत १९ हजार ९९० रुपये आहे. यात ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. यात ऑक्टाकोर अॅक्सिनॉस ९६१० प्रोसेसर आहे. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. यात २५ मेगापिक्सलचा, दुसरा ५ मेगापिक्सलचा आणि तिसरा ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या फोनची किंमत ९ हजार ९९० रुपये आहे. ६.२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्ले वर २.५डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन देण्यात आला आहे. कंपनीने या फोनमध्ये १.८ गीगाहर्ट्जचा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो ५०६ जीपीयू ३ व ४ जीबी रॅम आणि ३२ व ६४ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QmClde

Comments

clue frame