नवी दिल्लीः जिओ फायबरने ब्रॉडबँड क्षेत्रात प्रवेश केल्यापासून अन्य कंपन्यांनी आपले ग्राहक वाचवण्यासाठी नवनवीत योजना आणल्या आहेत. एक्सट्रीम फायबरनेही जिओ फायबरचा धसका घेतला असून, ग्राहकांसाठी मोफत सेवा देण्याचा निर्णय एअरटेलकडून घेण्यात आला आहे. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ''ची ब्रॉडबँड सेवा एका महिन्यासाठी मोफत दिली जात आहे. बेंगळुरू आणि चेन्नई येथे ही योजना राबल्यानंतर आता हैदराबादमध्ये ही योजना एअरटेलकडून राबवली जात आहे. रिलायन्स जिओ ब्रॉडबँड बाजारातील मायग्रेशन प्रोसेस डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी २०२० मध्ये संपुष्टात आणणार आहे. यानंतर जिओच्या ब्रॉडबँड ग्राहकांना सशुल्क सेवा घ्यावी लागणार आहे. यामुळे आपले ब्रॉडबँड ऑपरेटर बदलू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आणि त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी एअरटेलने एक महिन्याची मोफत सेवा योजना आणली आहे. एअरटेलचे अॅड-ऑन पॅक एअरटेल एक्सट्रीममध्ये १०० एमबीपीएस वेगासह दर महिन्याला १५० जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळतो. ग्राहकांना कंपनीकडून देण्यात येणारा डेटा कमी वाटतो. त्यामुळे २९९ रुपयांचा अॅड-ऑन पॅक कंपनीने जाहीर केला असून, यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा देण्यात येणार आहे. एअरटेल फायबरचे प्लान्स एअरटेल फायबरचा बेसिक प्लान ७९९ रुपयांचा आहे. यामध्ये १५० जीबी डेटा मिळतो. कंपनीकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या २९९ रुपयांच्या अॅड-ऑन प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा वापरण्यासाठी दिला जातो.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2r3hx1M
Comments
Post a Comment