मुंबई: ई-मेल, सोशल मीडियासह डिजीटल माहिती हॅक होत असल्याच्या घटना उघडकीस येतात. मात्र, या हॅकर्सना युजर्सच अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचे समोर आले आहे. अनेक युजर्स सहज हॅक होता येतील असे वापरत असल्याची माहिती सायबर सिक्युरीटी फर्म्सने दिली आहे. डिजीटल माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ही अधिक चांगला असणे आवश्यक असते. सिक्युरीटी सर्व्हिस फर्म स्पलॅश डाटाने ५० लाखाहून अधिक लीक झालेल्या पासवर्डसची तपासणी केली. त्यानंतर सर्वाधिक असुरक्षित असणाऱ्या ५० पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. २०१९ या वर्षात हे पासवर्ड अधिक असुरक्षित होते. या पासवर्डचा वापर करणे टाळले पाहिजे, असे फर्मने सुचवले आहे. >> हे पासवर्ड वापरणे टाळा १. 123456 २. 123456789 ३. qwerty ४. ५. 1234567 ६. 12345678 ७. 12345 ८. iloveyou ९. 111111 १०. 123123 ११. abc123 १२. qwerty123 १३. 1q2w3e4r १४. admin १५. qwertyuiop १६. 654321 १७. 555555 १८. lovely १९. 7777777 २०. welcome २१. 888888 २२. princess २३. dragon २४. password1 २५. 123qwe २६. 666666 २७. 1qaz2wsx २८. 333333 २९. michael ३०. sunshine ३१. liverpool ३२. 777777 ३३. 1q2w3e4r5t ३४. donald ३५. freedom ३६. football ३७. charlie ३८. letmein ३९. !@#$%^&* ४०. secret ४१. aa123456 ४२. 987654321 ४३. zxcvbnm ४४. passw0rd ४५. bailey ४६. nothing ४७. shadow ४८. 121212 ४९. biteme ५०. ginger गुगलकडून मिळणार रिअल टाइम प्रोटेक्शन पासवर्ड लीक अथवा कोणत्याही प्रकारच्या हॅकिंगपासून वाचण्यासाठी गुगल एक खास टूल क्रोम ब्राउजरमध्ये आणणार आहे. यामुळे युजर्सना रिअल टाइम सुरक्षा मिळणार. त्याशिवाय, पासवर्ड हॅक झाला किंवा डेटा हॅकिंग झाली असल्यास संबंधित युजर्सला त्याची माहिती देण्यात येईल.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35K3VaS
Comments
Post a Comment