नवी दिल्ली: भारतातील टेलिकॉम उद्योगात सुरू असलेल्या 'प्राइस वॉर' मुळे अनेक ग्राहक निराश झाले आहेत. ज्या डेटासाठी पूर्वी ग्राहकांना कमी शुल्क भरावे लागत होते, त्या पॅकसाठी आता त्याना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आता ग्राहकांना पूर्वीच्याच सवलती आणि फायद्यासाठी पूर्वीपेक्षा १.५ टक्के अधिक किंमत चुकवावी लागत आहे. याच कारणामुळे लोक आता किफायतशीर पर्याय शोधायला लागले आहेत. काही लोकांनी आपला मोबाइल नंबरच पोर्ट करण्याचा पर्याय शोधून काढला आहे. असे असताना, पोस्टपेडच्या ग्राहकांसाठीच्या कोणत्याही प्लानमध्ये मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत. याच कारणामुळे काही ग्राहक आता रद्द करून पोस्टपेड प्लान घेण्याचा पर्याय शोधू लागले आहेत. एअरटेलच्या वेबसाइटवर असलेल्या आकड्यांनुसार, १८ डिसेंबरपर्यंत (बुधवार) गेल्या सात दिवसांमध्ये सुमारे २० हजार पोस्टपेड कनेक्शनची ऑनलाइन खरेदी झालेली आहे. पाहुयात एअरटेलच्या पोस्टपेड सुविधा, ज्या प्रीपेड ग्राहकांना मिळत नाहीत... कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नाही प्रीपेड आणि पोस्टपेड या दोन्ही प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. परंतु, पोस्टपेड योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारच्या दैनंदिन डेटा मर्यादा नसतात. एअरटेलच्या बहुतेक प्रीपेड योजनांमध्ये दररोज १ जीबी, १.५ जीबी किंवा २ जीबी डेटा मिळतो. याचा अर्थ असा आहे की, बर्याच वेळा हा डेटा एखादा चित्रपट किंवा व्हिडिओ पाहता पाहता संपू शकतो. या नंतर आपल्याला दुसर्या दिवसाची वाट पहावी लागते. पोस्टपेड योजनांमध्ये मात्र असे होत नाही. एअरटेलच्या सर्वात स्वस्त ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ७५ जीबी डेटा उपलब्ध आहे. तो एका दिवसाच्या हिशेबानुसार २.५ जीबी इतका आहे. इतर फायदे एअरटेलच्या पोस्टपेड योजनेत करमणुकीशी संबंधित इतरही अनेक फायदे उपलब्ध आहेत. ४९९ रुपयांच्या इतर पोस्टपेड प्लानमध्ये नेटफ्लिक्सला ३ महिने, अॅमेझॉन प्राइम आणि झी-५ साठी एका वर्षासाठी सबस्क्रिप्शन मिळते. यात ग्राहकांना हँडसेट प्रोटेक्शन देखील मिळते. स्वतंत्रपणे मिळणाऱ्या या सुविधांची किंमत ३००० रुपयांपर्यंत आहे. प्रीपेड वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमची सुविधा मिळत नाही.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38KeDQJ
Comments
Post a Comment