ओप्पोचा A91 आणि A8 स्मार्टफोन लाँच

नवी दिल्लीः टेक कंपनी ओप्पोने ए सीरिजचे दोन फोन ए९१ आणि ए८ () आणि ए8 () चीनच्या बाजारात लाँच करण्यात आले आहेत. ग्राहकांना या दोन्ही मोबाइलमध्ये एचडी स्क्रीन, प्रोसेसर आणि कॅमेराचा सपोर्ट मिळणार आहे. लाँचिंग आधी या फोनचे वैशिष्ट्ये लीक झाले होते. त्यामुळे याची किंमत आणि काही फीचर्सची माहिती मिळाली होती. कंपनीने या आधी अनेक स्मार्टफोन बाजारात उतरवले होते. कंपनीने ए९१ च्या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १,९९९ चिनी युआन म्हणजेच २० हजार रुपये किंमत आहे. तसेच हा फोन ग्राहकांना रेड, ब्लू, आणि ब्लॅक या तीन रंगात फोनचा पर्याय उपलब्ध आहे. तर दुसरीकडे ए८ च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा व्हर्जनच्या फोनची किंमत चिनी युआन १,१९९ जवळपास १२ हजार रुपये इतकी आहे. चीनमध्ये हा फोन बाजारात आला असला तरी भारतात हा फोन कधी लाँच होणार आहे, याविषयी कंपनीकूडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले प्लस अॅमोलेड डिस्प्ले आहे. फोनमद्ये जबरदस्त परफॉरमन्ससाठी ऑक्टाकोर मीडियाटेक हिलिओ पी ७० चिपसेट देण्यात आला आहे. फोनच्या स्क्रीनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा सेन्सर, ८ मोगापिक्सलचा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PL7qIs

Comments

clue frame