ओप्पोचा A5 २०२० भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने भारतात आपला ए५ २०२० हा नवीन व्हर्जनचा स्मार्टफोन लाँच केला आहे. ६ जीबी रॅम, एचडी डिस्प्ले, आणि दमदार प्रोसेसर असलेल्या या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये आहे. हा फोन ग्राहकांना ऑफलाइन खरेदी करता येऊ शकणार आहे. याआधी कंपनीने हा फोन ४ जीबी रॅममध्ये बाजारात आणला होता. आता मात्र ६ जीबी रॅमचा फोन बाजारात आणला आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचा रिझॉल्युशन ७२० X १६०० पिक्सल आहे. या फोनमध्ये चांगला परफॉर्मंस देण्यासाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ एसओसी आणि ६ जीबी रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये स्क्रीन प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास ३ प्लस देण्यात आला आहे. यात क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा डेप्थ अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम शूटर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. मोबाइल ग्राहकांना जबरदस्त सेल्फी काढता यावा यासाठी ८ मेगापिक्सलचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये ५,००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZC4bqh

Comments

clue frame