365 दिवसांचा बेस्ट प्रीपेड प्लान कुणाचा? पाहा

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा बघायला मिळतेय. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनसारख्या दिग्गज कंपन्यांनी अनेकदा आपल्या प्लानमध्ये फेरबदल केलेत. यामुळेच कोणता प्लान निवडायचा यावरून ग्राहक संभ्रमात पडतात. हा घोळ होऊ नये यासाठी अनेक ग्राहक एक वर्षाचा प्लान घेतात. पण एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि जिओ यापैकी कुणाचा प्लान घ्यायचा असा प्रश्न ग्राहकांना पडतो. कुठला प्लान घेतल्याने तुम्हाला काय फायदा होऊ शकतो ते पाहूया... चा 365 दिवसांचा प्लान रिलायन्स जिओचे 365 दिवसांच्या वैधतेसह दोन प्लान आहेत. पहिल्या प्लानची किंमत 1299 रुपये आहे. तर, दुसर्‍या प्लानची किंमत 2,199 रुपये आहे. 1299 रुपयांच्या प्लानमध्ये एकूण 24 जीबी डेटा दिला आहे. यात रोजच्या डेटा वापरावर मर्यादा नाहीए. या व्यतिरिक्त, जिओ ते जिओकडून अनलिमिटेड कॉल आणि जिओवरून इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 12,000 FUP मिनिटं मिळतात. यात तुम्हाला 36०० एसएमएसची सुविधाही देण्यात आलीय. दुसरा प्लान 2,199 रुपयांचा आहे. यात रोज 1.5 जीबी डेटा मिळतो. यानुसार आपल्याला वर्षभरात एकूण 547.5 जीबी डेटा मिळतो. या व्यतिरिक्त, जिओवरून जिओवर अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओवरून इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 12,000 एफओपी मिनिटं मिळतात. तसेच दररोज 100 एसएमएस प्राप्त होतात. दोन्ही प्लानमध्ये Jio अॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत देण्यात आले आहे. चा 365 दिवसांचा प्लान एअरटेलमध्येही 365 दिवसांकरता दोन प्लान आहेत. एक 1498 रुपये आणि दुसरा 2, 398 रुपयांचा आहे. 1498 रुपयांच्या प्लानमध्ये 3600 एसएमएस आणि 24 जीबी डेटा मिळतो. यात कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. तर दुसऱ्या 2, 398 प्लानमध्ये रोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. यातही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. एअरटेलच्या दोन्ही प्लानसोबत Xstream, Zee5 आणि Wynk Music या अॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळते. चा 365 दिवसांचा प्लान एअरटेल आणि जिओ प्रमाणे व्होडाफोननेही 365 दिवसांचे प्लान उपलब्ध केले आहेत. एक 1499 रुपये आणि दुसरा 2, 399 रुपयांचा आहे. प्लानची तुलना केल्यास एअरटेल आणि व्हिडाफोनचे प्लान जवळपास सारखे आहेत. 1499 रुपयांच्या प्लानमध्ये 3600 एसएमएस आणि 24 जीबी डेटा दिला गेलाय. तसंच कुठल्याही नेटवर्कला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. दुसऱ्या 2, 399 रुपयांच्या प्लानमध्ये रोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस देण्यात आलेत. यात अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली गेलीय. व्होडाफोनच्या दोन्ही प्लानमध्ये Vodafone Play आणि ZEE5 चे सब्सक्रिप्शन दिले गेले आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QfluJt

Comments

clue frame