नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नवीन प्लान घेऊन आल्या आहेत. पण हे प्लान आधीच्या तुलनेत महागडे आहेत. सध्या एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया आपल्या प्लानमध्ये अनलिमिडेट कॉलिंगचा फायदा ग्राहकांना देत आहेत. तर दूसऱ्या नेटवर्कवरील कॉलिंगसाठी नॉन जिओवर FUP मिनिट देत आहेत. रोज 2GB डेटा देणारे ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीतले प्लान कुठले आहेत ते आपण पाहूया... एअरटेलचा २९८ रुपयांचा प्लान एअरटेलच्या २९८ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकाला रोज 2GB डेटा मिळेल. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. म्हणजे ग्राहकाला एकूण 56GB डेटा मिळतो. एअरटेलच्या या प्लानमध्ये ग्राहकाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आलीय. रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा आहे. एअरटेल Xstream अॅपचा प्रीमियम अॅक्सेस मिळतो. व्होडाफोन-आयडियाचा 299 चा प्लान व्होडाफोनच्या 299 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकाला रोज 2GB मिळतो. या प्लानची वैधताही २८ दिवसांची आहे. यातही ग्राहकाला 56GB डेटा मिळतो. रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते. अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा. कुठल्या नेटवर्कवर मोफत लोकल किंवा नॅशनल कॉल करण्याची सुविधा. Vodafone Play चे सब्सक्रिप्शन मिळणार. रिलायन्स जिओचा 249 रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा रोज 2GB डेटा प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहे. पण यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगचा फायदा नाहीए. फक्त जिओ टू जिओ कॉलिंगचा फायदा ग्राहकांना मिळतो. दुसऱ्या नेटवर्कसाठी कंपनीने FUP मिनट दिले आहेत. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. युजर्सला 56GB डेटा मिळतो. रोज 100 SMS पाठवा येतात. सोबतच जिओ अॅपचे सब्सक्रिप्शन मिळते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZgFYFA
Comments
Post a Comment