मेसेज आपोआप डिलीट होणार, WhatsApp ची नवी अपडेट

मुंबई : ने आपल्या युझर्ससाठी एक नवीन अँड्रॉईड बीटा अपडेट आणली आहे. या अपडेटमुळे युझर्सना आता मेसेज आपोआप डिलीट करता येतील आणि मेसेज डिलीट करण्याची वेळही निश्चित करुन ठेवता येईल. काही दिवसांपूर्वीही या फीचरबाबत माहिती समोर आली होती. पण हे फीचर या नावाने सांगितलं जात होतं. WhatsApp ने अँड्रॉईड बीटा अपडेटमध्ये या फीचरचं नाव बदलून ठेवलं आहे. सर्वच युझर्स सध्या या फीचरचा वापर करू शकत नाहीत. कारण, या फीचरची अजून चाचणी सुरू आहे. WhatsApp ट्रॅकर वेबसाइट ने या फीचरचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. लेटेस्ट बीटा अपडेटमध्ये हे फीचर डार्क मोडमध्येही पाहिलं जाऊ शकतं. नवीन बीटा अपडेट WhatsApp व्हर्जन २.१९.३४८ मधून रोलआऊट केली जात आहे. गुगल प्ले स्टोअरवरुनही ही अपडेट डाऊनलोड केली जाऊ शकते. हे फीचर कॉन्टॅक्ट इन्फो किंवा ग्रुप सेटिंगमध्ये मिळेल. दरम्यान, हे केवळ Admin कडूनच सुरू केलं जाऊ शकतं. सर्व ग्राहकांना हे फीचर मिळण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. डिलीट मेसेज फीचरमुळे युझर्स एखादा मेसेज आपोआप डिलीट होण्याची वेळही सेट करू शकतात. मेसेज आपोआप डिलीट होण्यासाठी युझर्सला एक तास, एक दिवस, एक आठवडा, एक महिना आणि एक वर्षाचा पर्याय देण्यात आला आहे. युझर्सला स्वतःच्या सोयीनुसार हा पर्याय निवडता येईल. या फीचरचं स्टेबल व्हर्जन आल्यानंतर आणखी काही नवे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. डार्क मोडसोबतही हे फीचर काम करणार आहे. डार्क मोड फीचरचीही अजून चाचणी सुरू आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XODGgd

Comments

clue frame