मुंबई: चीनची स्मार्टफोन बनवणारी कंपनी भारतात आपला नवा स्मार्टफोन ९ डिसेंबरला लाँच करणार आहे. कंपनीने V सिरीजच्या लाँच इव्हेंटसाठी निमंत्रणं पाठवायला सुरुवात केली आहे. विवोने काही दिवसांपूर्वीच हा स्मार्टफोन रशियात लाँच केला होता. विवोने पाठवलेल्या निमंत्रणात या फोनच्या नावाचा उल्लेख नाही, मात्र तरीही ९ डिसेंबरला Vivo V17 या फोनचंच लाँच होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. Vivo V17 पंच होल डिस्प्लेसह येणार आहे. रशियात हा फोन वॉटरड्रॉप स्टाइल नॉचसह लाँच करण्यात आला होत. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच भारतात Vivo V17 Pro लाँच केला होता. २९,९९० रुपये किंमतीच्या या फोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेऱ्यासह रिअर स्क्वॉड कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. Vivo V17 ची वैशिष्ट्ये Vivo V17 मध्ये ६.३८ इंचाचा फुल एचडी + सुपर AMOLED फुल्ल व्ह्यू डिस्प्ले आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रॅमच्या व्हेरिएंटसह येतो. याला स्नॅपड्रॅगन ६६५ एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिलेला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सल कॅमेरा आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे. या बॅटरीमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35Micn7
Comments
Post a Comment