Redmi Note 8 Proचा आजपासून सेल

नवी दिल्लीः शाओमी कंपनीने चा सेल आजपासून सुरू केला आहे. ग्राहक हा फोन mi.com शिवाय Amazon इंडियावरून खेरदी करू शकतात. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. यासोबतच अनेक उत्तम फिचर्सही आहेत. खास गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनवर आकर्षक लाँच ऑफर देण्यात आली आहे. Redmi Note 8 Proच्या खरेदीवरील ऑफर Redmi Note 8 Pro या स्मार्टफोनची किंमत १४, ९९९ रुपये आहे. तीन प्रकारात हा फोन उपलब्ध आहे. ६ जीबी + 64 जीबी, ६ जीबी + 128 जीबी आणि ८ जीबी + १२८ जीबी अशा तीन प्रकारात हा फोन लाँच केला गेलाय. ग्राहकांना उत्तम ऑफर आणि डीलमध्ये आज हा फोन खरेदी करण्याची संधी आहे. अॅक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिटवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० टक्क्यांचा डिस्काउंट आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांना २४९ आणि ३४९ रुपये रिचार्जवर डबल डेटा देऊ केला आहे. तसंच आज Redmi Note 8 Pro नो कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येईल. रेडमी नोट ८ प्रोची वैशिष्ट्य 1080x2340 पिक्सल रिजॉल्युशनसोबत ६.५३ इंच फुल एचडी आणि एचडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अॅंड्रॉइड ९ वर आधारित MIUI 10 ओएसवर काम करतो. ह्या फोनमधील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात दिला गेलेला कॅमेरा सेटअप. फोनच्या मागच्या बाजूला तुम्हाला ४ कॅमेरे मिळतील. यात ६४ जीबी मेगापिक्सलसह प्राइमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचे डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सल मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सल कॅमेरा दिला गेलाय. ऑक्टा-कोर मीडियाटेक हिलिओ G90T प्रोसेसर दिला गेलाय. ४,५०० mAh एवढी फोनची बॅटरी आहे. ही बॅटरी १८ वॉटवर फास्ट चार्ज होते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XPi0Rc

Comments

clue frame