iPhone 11 पेक्षाही जुन्या आयफोनची किंमत जास्त

मुंबई : तुम्हाला प्रीमिअम आणि सर्वात महागडा आयफोन खरेदी करायचा असेल तर स्वाभाविकपणे कुणीही लेटेस्ट मॉडेल घेण्यालाच पसंती देईल. पण मजेशीर बाब म्हणजे सर्वात महागडा आयफोन घ्यायचा असेल, तर गेल्यावर्षी लाँच झालेला खरेदी करावा लागेल. कारण, लेटेस्ट च्या टॉप व्हेरिएंटपेक्षाही या जुन्या आयफोनची किंमत जास्त आहे. देशात आयफोनचा सर्वात महागडा फोन लेटेस्ट iPhone 11 Pro Max नसून जुना iPhone XS Max असणं हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक आहे. या दोन्ही फोनमध्ये ५१२ जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. वाचा : अमेझॉनवर लेटेस्ट iPhone 11 Pro Max च्या टॉप व्हेरिएंटची किंमत १ लाख ३८ हजार ९०० रुपये आहे. तर iPhone Xs Max च्या टॉप व्हेरिएंटची (५१२ जीबी) किंमत १ लाख ४४ हजार ९०० रुपये दाखवत आहे. अमेझॉनवर सध्या सेलमध्ये iPhone Max XS वर १३ हजार रुपये सूट दिली जात असून याची सध्याची किंमत १ लाख ३१ हजार ९०० रुपये आहे. १७ नोव्हेंबरला ऑफर संपल्यानंतर हा फोन पुन्हा १ लाख ४४ हजार ९०० रुपयांमध्येच उपलब्ध असण्याची शक्यता आहे. वाचा : विशेष म्हणजे iPhone 11 Pro Max आणि iPhone Xs Max च्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची तुलना केली तरीही iPhone Xs Max ची किंमत जास्त आहे. iPhone 11 Pro Max च्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत अमेझॉनवर १ लाख २३ हजार ९०० रुपये दाखवत आहे, तर iPhone Xs Max च्या २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १ लाख २४ हजार ९०० रुपये आहे. सेलमध्ये यावर १५ हजार रुपये सूट दिली जात आहे. त्यामुळे सध्याची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये आहे. वाचा : या दोन्ही फोनचं ६४ जीबी व्हेरिएंट एकाच किंमतीत उपलब्ध आहे. iPhone 11 Pro Max आणि iPhone Xs Max या दोन्ही व्हेरिएंटची किंमत एक लाख ९ हजार ९०० रुपये आहे. सध्या सुरु असलेल्या स्पेशल सेलमध्ये iPhone Xs Max ९४ हजार ९०० रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यावर १५ हजार रुपये सूट दिली जात आहे. डिस्काऊंटसह iPhone XS Max वर ७४५० रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही उपलब्ध आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NLajIt

Comments

clue frame