नवी दिल्ली: रिलायन्स जिओ फाइबर वापरकर्त्यांसाठी कंपनीने एक नवीन योजना बाजारात आणली आहे. ३५१ रुपये किंमतीची ही योजना जिओ फायबरने दिलेली सर्वात स्वस्त योजना आहे. जिओ फायबर लॉन्च होण्यापूर्वी कंपनीला आपल्या ग्राहकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु व्यावसायिक लाँचनंतर जिओ फायबरला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे जिओ फायबरच्या महागड्या योजना असल्याचे म्हटले जात आहे. जिओ सुरुवातीपासूनच स्वस्त सेवा प्रदान करण्यासाठी ओळखला जातो आणि ग्राहकांना देखील कंपनीकडून हीच अपेक्षा होती. तथापि, ग्राहकांना नेमके काय हवे आहे हे लक्षात घेत कंपनीने आता आपल्या जिओ फायबर पोर्टफोलिओमध्ये स्वस्त योजना अंतर्भूत केली आहे. चला जाणून घेऊया, जिओ फायबरची नवीन योजना काय आहे आणि त्याद्वारे ग्राहकांना कोणते फायदे दिले जात आहेत. योजनेचे फायदे रिलायन्स जिओ फायबरची ही योजना ज्यांना जास्त डेटा आणि अल्ट्रा फास्ट स्पीडची आवश्यकता नसते अशा ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली गेली आहे. योजनेत मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या ३५१ मासिक प्लानमध्ये १० एमबीपीएसच्या वेगाने दरमहा ५० GB जीबी डेटा मिळणार आहे. एफयूपीची मर्यादा संपल्यानंतर, या योजनेत उपलब्ध 10 एमबीपीएसची इंटरनेट गती ही कमी होऊन ती १ एमबीपीएस इतकी होईल. योजनेची एक खास गोष्ट म्हणजे या प्लानअंतर्गत ग्राहकांना विनामूल्य अमर्यादित कॉलिंग मिळणार आहे. इन्स्टॉलमेंट शुल्क लागणार नाही टेलिकॉम टॉकच्या एका अहवालानुसार, ही योजना सबस्क्राइब करणाऱ्या ग्राहकांना जिओ कनेक्शनसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की, कंपनी ग्राहकांकडून कोणतेही इन्स्टॉलेशन शुल्क आकारणार नाही किंवा त्याला वन-टाइम शुल्क भरावे लागणार नाही. आतापर्यंत ग्राहकाला रिलायन्स जिओच्या कनेक्शनसाठी २५०० रुपये द्यावे लागत होते. यात काही टक्के परतफेड देखील मिळत होती. परंतु ३५१ रुपयांच्या या नव्या योजनेत असे काहीही नाही. जर आपण जिओची ही योजना घेत असाल तर तुम्हाला जीएसटीसह एकूण ४१४ रुपये द्यावे लागणार आहेत. योजनेत मिळालेल्या अतिरिक्त फायद्यांविषयी बोलायचे झाल्यास, ग्राहकांना कॉम्प्लिमेंटरी टीव्ही व्हिडिओ कॉलिंग ऑफर केले जात आहे. याद्वारे, ग्राहक या योजनेची ३ महिने, ६ महिने आणि अर्ध-वार्षिक सबस्क्रिप्शन देखील निवडू शकतात. परंतु, त्यांना यामध्ये कोणताही अतिरिक्त लाभ मिळणार नाही.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33wSK3g
Comments
Post a Comment