BSNL या प्लानमध्ये देतेय दररोज २ जीबी डेटा

नवी दिल्ली: सरकारी टेलिकॉम कंपनी ने यावर्षी अनेक नवे प्लान्स लाँच केले आहेत. याच कारणामुळे बीएसएनएलकडे सध्या विविध प्रकारचे आणि अनेक प्रकारचे फायदे देणारे प्लान्स आहेत. आपल्या आकर्षक प्लान्सद्वारे यूजर्सना बेस्ट डील ऑफर करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यूजर्सला सर्वाधिक डेटा देणारे प्लान्सच जास्त पसंत पडतात, असं कंपनीचं निरीक्षण आहे. कंपनीने हेच ध्यानात ठेवून ९९८ रुपयांचं एक डेटा स्पेशल टॅरिफ वाऊचर लाँच केलं आहे. हे लाभ मिळतील बीएसएनएलने हा प्लान सध्ये केवळ केरळमध्ये उपलब्ध केला आहे. यात दररोज ऑफर करण्यात आला आहे. प्लानची व्हॅलिडिटी २१० दिवस आहे. या हिशेबाने प्लानमध्ये मिळणारा एकूण डेटा ४२० जीबी आहे. हा प्लान घेणाऱ्या यूजर्सना सुरुवातीचे दोन महिने पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन बेनिफिट दिला जाणार आहे. बीएसएनएलचा हा प्लान एसटीव्ही आहे म्हणून यात फ्री कॉलिंग किंवा एसएमएसचा लाभ मिळत नाही. कॉम्बो प्लान्समध्ये कोणता चांगला कॉम्बो प्लान्सची तुलना केली तर डेटा ओन्ली प्रीप्रेड प्लानमध्ये तुम्हाला थोडी जास्त व्हॅलिडिटी मिळते. अलीकडेच बीएसएनएलने एक ९९७ रुपयांचा कॉम्बो प्लान लाँच केला होता. या प्लानमध्ये २५० मिनिटांच्या कॅपिंगसह अनलिमिटेड डेली कॉलिंग, रोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जाणर आहेत. या प्लानची व्हॅलिडिटी १८० दिवसांची आहे. डेटा एसटीव्हीसोबत याची तुलना केल्यास ९९८ रुपयांचा २१९ दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज २ जीबी डेटा मिळेल. कोणता प्लान आहे बेस्ट? डेटा एसटीव्ही त्या यूजर्ससाठी चांगला आहे, जे व्हॉट्स अॅप किंवा कुठल्या VoIP कॉलिंग अॅपचा वापर करत नाहीत. अन्य यूजर्ससाठी अनलिमिटेड कॉम्बो प्लानचे फायदेशीर आहे. डेटा ओन्ली प्लान जास्त पॉप्युलर नाही. म्हणून एअरटेल किंवा वोडाफोनसारख्या मोठ्या कंपन्या असा कुठला प्लान ऑफर करत नाही.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2r2XEry

Comments

clue frame