सॅनफ्रान्सिस्को फेसबुकने आपल्या कंपन्या फेसबुक, , मेसेंजर आणि इन्स्टाग्रामवर पैसै भरण्यासाठी नवी सिस्टीम ' पे' लाँच केली आहे. अमेरिकेत या आठवड्यापासून सुरू होत आहे. लवकरच ही सिस्टीम भारतातही येईल. फंडरेजिंग, इन गेम खरेदी कार्यक्रमांची तिकीटं, मेसेंजरवरील पेमेंट आणि फेसबुक मार्केट प्लेसवर पेज आणि व्यापारी खरेदी करणं लोकांनी फेसबुक पे द्वारे सुरूही केलं आहे. फेसबुकचे मार्केटप्लेस आणि कॉमर्स शाखेचे उपाध्यक्ष देबोरा लिउ म्हणाले, 'टप्प्याटप्य्याने फेसबुक पे योजना आणखी लोकांपर्यंत, जगभरातील आणखी स्थानांपर्यंत आणि , व्हॉट्सअप वरही सुरू केली जाणार आहे.' कंपनीने सांगितलं की फेसबुक पे आर्थिक संरचना आणि भागीदारीवर आधारित आहे. कंपनीची डिजीटर करन्सी लिब्रा नेटवर्कवर चालणाऱ्या लिब्रा वॉलेटपेक्षा हे वेगळं आहे. फेसबुक किंवा मेसेंजरवर काही पायऱ्यांची प्रक्रिया करताच तुम्ही फेसबुक पेचा वापर सुरू करू शकता. यासाठी फेसबुक अॅप किंवा वेबसाइटवर आधी सेटिंगमध्ये जाऊन नंतर 'फेसबुक पे' वर जाऊन पेमेंट मेथड जोडा. यानंतर तुम्ही पुढील पेमेंट केल्यानंतर फेसबुक पे वापरू शकता. ‘फेसबुक पे’ प्रणालीच्या माध्यमातून अत्यंत सहज आणि अतिशय सुरक्षितपणे व्यवहार करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. यात युजर पीन क्रमांक तसेच फेस आयडी अथवा टच आयडीचे सुरक्षा कवचदेखील लावण्याची सुविधा मिळेल. व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्रामवर फेसबुक पे सुरू होताच तुम्ही ते प्रत्येक अॅपवर थेट कनेक्ट करू शकाल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32Koemm
Comments
Post a Comment