नोकियाची ऑफर; मोबाइलवर ५ हजाराचे गिफ्ट कार्ड

नवी दिल्लीः नोकिया स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. नोकिया स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD Global कंपनीला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने कंपनी ग्राहकांनी स्मार्टफोन खरेदीवर मोठी घोषणा केलीय. नोकियाच्या काही स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी ५००० हजार रुपयांचे गिफ्ट देत आहे. कंपनी अशा नावाने ही ऑफर दिली आहे. १ डिसेंबर संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत ही ऑफर असेल. यामुळे ग्राहकांना आपला आवडता स्मार्टफोन घेता येणार आहे. तर कंपनीने कुठल्या स्मार्टफोनवर ही ऑफर दिलीय ते बघूया... आणि गिफ्ट कार्ड क्लेम करण्यासाठी प्रोमो कोड GIFTCARD चा उपयोग करा. नोकिया 7.2 १८, ५९९ रुपये किंमतीच्या स्मार्टफोनवर कंपनीने ५००० हजार रुपयांचे गिफ्ट कार्ट देऊ केले आहे. ६४ जीबी स्टोरेज सोबत ४ जीबी आणि ६ जीबी रॅमचे यात पर्याय आहेत. फोनमध्ये ६६० स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासोबत प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यातील ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत १९, ५९९ रुपये आहे. नोकिया 6.2 १६ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सेल + ८ मेगापिक्सेलसह या नोकिया स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसर आहे. हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. फोन खरेदीवर कंपनी ४००० रुपयांचे गिफ्ट कार्डची ऑफर दिलीय. नोकिया 6.1 प्लस ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह असलेल्या या फोनच्या खरेदीवर कंपनीने ५००० रुपयांचे गिफ्ट कार्ड ऑफर केले आहे. फोनमध्ये ५.८० इंचाचा डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस १६ मेगापिक्सेल 5 मेगापिक्सल आणि समोरील बाजूने १६ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसरसह सज्ज असलेल्या या फोनची किंमत १३, ५२७ रुपये आहे. नोकिया 5.1 प्लस ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह या फोनची किंमत १३, ७५७ रुपये आहे. फोन खरेदीवर ५००० रुपयांचे गिफ्ट कार्डची ऑफर दिली आहे. वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर फोनमध्ये १३ मेगापिक्सलसह ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ८-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. एसडी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी ४०० जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. नोकिया 4.2 नोकिया ४.२ च्या खरेदीवर २००० रुपयांचे गिफ्ट कार्ड दिले जात आहे. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह या फोनची किंमत ९,४९९ रुपये आहे. स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलसह २ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35ANmh9

Comments

clue frame