नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपकडून गेल्या आठवड्यापासून संशयास्पद नाव असणाऱ्या ग्रुप्सना कायमचे टाळं लावण्यात आलं आहे. संशयासंपद नाव किंवा एखादा हेतू बाळगून तयार केलेल्या ग्रुपवर व्हॉट्पअॅप कारवाई करत आहे. हॅकिंगची वेगवेगळी प्रकरण समोर येऊ लागल्याने कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. पेगासस स्पायवेअरच्या नावानं तयार केलेला ग्रुप बँन होण्याची शक्यता आहे. एका व्हॉट्सअॅप युजरनं त्यांच्या कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचं नाव बदलून एका अक्षेपार्ह शब्दावरून नाव ठेवलं होतं. त्यानंतर काही वेळातच व्हॉट्सअॅपकडून पूर्ण ग्रुप बॅन करण्यात आला. युजरच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅपनं फक्त ग्रुपचं नाही तर ग्रुपमधील सर्व मेंबरना बॅन केले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता १०० ग्रुप मेंबरना बॅन केल्याचं समोर आलं आहे. वाचाः व्हॉट्सअॅपनं बॅन केल्याचं लक्षात येताच युजरनं कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कंपनीनं तुम्ही व्हॉट्सअॅपचे नियम आणि अटींचं उल्लंघन केल्यामुळं तुम्हाला बॅन केलं असल्याचं स्पष्ट केलं. व्हॉट्सअॅपनं एकदा बॅन केल्यानंतर कंपनीकडून कोणत्याही प्रकारे मदत केली जात नाही. त्यामुळं व्हॉट्सअॅप वापरताना आता युजर्सना खबरदारी बाळगणे गरजेचं आहे. शक्यतो संशयास्पद ग्रुपचा हिस्सा होण्याआधी त्याची माहिती पडताळून पाहा. ग्रुप अॅडमिननं ग्रुप सेटिंग बदलणे गरजेचं व्हॉट्सअॅप ग्रुपचं नाव कोणाताही ग्रुप मेंबर बदलू शकतो. व्हॉट्सअॅपला ते नाव अक्षेपार्ह वाटलं तर अॅडमिनसह ग्रुपमधील इतर मेंबरही बॅन होण्याची शक्यता आहे. यासाठी अॅडमिननं ग्रुप इन्फो रिस्ट्रिकशनची मदत घेणं गरजेचं आहे. या सेटिंगच्या माध्यमातून फक्त अॅडमिन ग्रुपची माहिती बदलू शकतो. व्हॉट्सअॅप कोण-कोणत्या शब्दांना अक्षेपार्ह आणि संशयास्पद मानते हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NEhL81
Comments
Post a Comment