रियलमी एक्स-२प्रोचा भारतातील पहिला सेल सुरू

नवी दिल्लीः भारतात मागच्याच आठवड्यात ' एक्स-२ प्रो' लाँच झाला. 'एक्स-२ प्रो'ची सुरुवातीची किंमत २९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा रियलमीचा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन असून आजपासून या स्मार्टफोनचा भारतात पहिला सेल आहे. रियलमी एक्स-२प्रोच्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरियंटची किंमत भारतीय बाजारपेठेत २९,९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी + २५६ जीबी व्हेरियंटची किंमत ३३,९९९ रुपये आहे. आजपासून सुरु झालेला हा सेल २७ नोव्हेंबर दुपारी १२ पर्यंत चालणार आहे. मात्र, हा सेल फक्त 'इनव्हाइट' ग्राहकांसाठी आहे. तसंच, युजर्स फ्लिपकार्ट आणि रिअलमी स्टोअरमध्येही ग्राहक फोन खरेदी करू शकतात. वाचाः ऑफर्स या स्मार्टफोनबरोबर ६ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट इएमआय आणि जियोकडून ११,५०० रुपयांपर्यंत बोनीफिट्स मिळणार आहेत. तसंच, फ्लिपकार्टच्या कार्डलेस क्रेडिटचाही फायदा ग्राहकांना होणार आहे. याचबरोबर रियलमी ऑनलाइन स्टोअरवर पहिल्या १ हजार ग्राहकांना ७ दिवसांचा रिटर्न ऑफरसुद्धा मिळणार आहे. रिअलमी एक्स-२प्रोचा मास्टर एडिशनसुद्धा कंपनीनं लाँच केला असून त्याची किंमत ३४,९९९ रुपये आहे. मात्र, या फोनचा सेल नाताळ सणाच्या काळात असणार आहे. वाचाः फिचर स्मार्टफोनमध्ये ९० एचझेड अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले दिला आहे. तसंच, एफएचडी+ रिझोल्यूशनसोबत ६.५ इंच सुपर अल्मोड स्क्रीन दिली आहे. 'रियलमी एक्स२ प्रो'मध्ये ४ रियर कॅमेरा दिले आहेत. ६४ मेगापिक्सल कॅमेराबरोबरच ११५ डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यूसोबत ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला २०एक्स हायब्रिड झूममुळं फोकस चांगला होण्यास मदत होते. सेल्फीसाठी एडीआर आणि एआय ब्यूटीफिकेशनसोबत १६ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2DgM2nt

Comments

clue frame