'विवो एस५ 'लाँच; डायमंड कॅमेरा सेटअप आणि बरंच काही...

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी विवोनं 'एस५' स्मार्टफोन बाजारात आणला आहे. बीजिंगमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात कंपनीनं फोन लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी या फोनचे फिचर्स ऑनलाइन लीक झाले होते. तेव्हापासूनच युजर्समध्ये फोनविषयी उत्सुकता होती. ' एस५'मध्ये पंचहोल डिस्प्ले देण्यात आला आहे. याआधी फक्त सॅमसंगमध्ये पंचहोल डिस्प्ले देण्यात आला होता. वीवो एस५' स्मार्टफोन ही अलीकडेच लाँच झालेल्या 'वीवो एस१' सीरीजचे पुढील व्हर्जन आहे. कॅमेरा फोनमध्ये चार रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत. २८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल+ ५ मेगापिक्सल असे तीन कॅमेरा देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. फिचर्स फोनची ब्राइटनेस लेव्हल १२०० ठेवण्यात आली आहे. हा फोन TUV Rhinelandनं प्रमाणित असून फोनमुळं डोळ्यांवर कोणताही प्रकारे ताण येत नाही. तसंच, फोनमध्ये ६.४४ इंच ओएलइडी डिस्प्ले दिला असून त्याचे रिजॉलूशन १०८० पिक्सल आहे. फोनमधील स्क्रीन टु बॉडी रेशो ९१.३८% आहे. फोनमध्ये ऑन स्क्रीन कॅमेरा सेंसरसुद्धा आहे. हा फोन ८ जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी या वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. फोनचे वजन फक्त १८८ ग्रॅम असून, बॅटरीची क्षमता ४१०० एमएएच दिली आहे. किंमत फोनची सुरुवातीची किंमत २६९८ युआन म्हणजे भारतीय रुपयांनुसार जवळपास २७,००० आहे. तसंच, वीवो एस५च्या टॉप वेरियंटची किंमत ३०,००० रुपये आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KpwTEj

Comments

clue frame