फोनच्या स्फोटात युवकाचा मृत्यू, राहा सावध!

नवी दिल्ली: स्मार्टफोनचा स्फोट होणे किंवा फोनने पेट घेणे या घटना काही नव्या नाहीत, मात्र अशा एका घटनेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ओडिशातील पारादीप येथे एका युवकाचा स्मार्टफोनचा स्फोट होऊन मृत्यू झाला आहे. हा युवक आपला स्मार्टफोन चार्जिंगला लावून झोपला होता. त्याने आपला फोन अगदी बाजूला बिछान्यावरच चार्जिंगला लावल्याने या स्फोटात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्मार्टफोनच्या बॅटरी जार्ज होत असताना एक रासायनिक प्रक्रिया होत असते. या वेळी बॅटरीवर दाब येत असतो. मात्र हा दाब मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास बॅटरीचा स्फोट होतो. स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होणे ही काही सहज घडणारी घटना नाही. मात्र, अशी घटना घडू नये यासाठी वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. अगदी सॅमसंग आणि शाओमीच्या लोकप्रिय स्मार्टफोन्सपासून ते आयफोनपर्यंतच्या डिव्हायसेसना आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. असे होऊ नये यासाठी फोन चार्ज करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच काही चुका आपल्याकडून होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. पाहुयात, काय काळजी घेतली पाहिजे जेव्हा फोन चार्ज होत असतो... > आपला फोन कपडे, कापूस,किंवा बेड अशा ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवा > फोनची बॅटरी बनवायची असेल, तर बँडेड बॅटरीच लावा. कधीही स्वस्त आणि कमी दर्जाची बॅटरी आपल्या फोनमध्ये बसवू नका. > उशीखाली फोन ठेवून झोपणे धोकादायक आहे. याचे कारण म्हणजे फोनची तापमान वाढते आणि त्यावर दाबही पडत असतो. > जर फोन सतत वापरून गरम झाला असेल, तर त्याला थंड होऊ द्या. फोन गरम झाल्यानंतर सतत त्याचा वापर करू नका. > फोन खराब झाल्यास लोकल शॉपवर दुरुस्त करू नका. कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्येच फोन दुरुस्त करणे सुरक्षित असते. तिथे ओरिजनल पार्ट्स देखील मिळतात. चार्जिंगसाठी > फोन चार्ज करत असताना त्यावर कोणतीही वस्तू ठेवलेली नाही, किंवा त्यावर कशाचाही दाब पडत नाही ना याची खात्री करा > नेहमी फोनचा ओरिजनल चार्जर वापरा. ड्युप्लिकेट किंवा इतरांच्या फोनचा चार्जर वापरल्यास फोन आणि बॅटरीचे नुकसान होऊ शकते. > फोन चार्ज करताना त्यावर ऊनतर पडत नाही ना याची काळजी घ्या. याने फोनचे नुकसान होऊ शकते. > रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवू नका. असे कधीही करू नका. हे फोन आणि बॅटरीसाठी हानिकारक आहे. > फोनला थेट पॉवर सॉकेटद्वारे चार्ज करा. एक्स्टेंशनद्वारे चार्ज करणे टाळा.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33OF9Wk

Comments

clue frame