वोडाफोनचे ३०० रुपयांत अनलिमिटेड प्रीपेड प्लान

नवी दिल्लीः दूरसंचार क्षेत्रात सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपन्यांचे वर्चस्व पाहायला मिळतेय. या स्पर्धेत वोडाफोनही आपलं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. वोडाफोननं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनलिमिटेड कॉम्बो आणले आहेत या प्रीपेड प्लानमध्ये डेटा, व्हॉइल कॉल आणि एसएमएससारख्या सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. वोडाफोननं ३०० रुपयांपर्यंतचे कॉम्बो पॅक ग्राहकांसाठी आणले आहेत. १५० रुपयांत प्रीपेड प्लान वोडाफोनकडं १५० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले दोन प्रीपेड प्लान आहेत. यात १२९ रुपये व १३९ रुपयांचे हे डेटा पॅक आहेत. या दोन्ही प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडिटीसोबत अनलिमीटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळणार आहे. १२९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा तर, १३९ रुपयांच्या प्लानमध्ये ३ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. २०० रुपयांत बेस्ट प्रीपेड प्लान २०० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले दोन प्रीपेड प्लान युजर्सना कंपनीनं ऑफर केले आहेत. १६९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी आणि रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. तर, १६९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी १.५ जीबी डेटा मिळणार आहे. याचबरोबर अलिमीटेड कॉलिंगसह रोज १०० फ्री एसएमएस मिळणार आहेत. २५० रुपयांत चार प्रीपेड प्लान वोडाफोनकडं २५० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले चार डेटा प्लान आहेत. यात २०५ आणि २२५ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना जास्त व्हॅलिडिटी मिळते तर, २०९ आणि २९९ रुपयांच्या प्लानमध्ये जास्त डेटा ग्राहकांना दिला आहे. २०५ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमीटेड कॉलिंग आणि ३५ दिवसांसाठी २ जीबी डेटा व ६०० फ्री एसएमएससाठी देण्यात आले आहेत. २२५ रुपयांच्या या प्लानमध्ये ४८ दिवसांची व्हॅलिडिटीसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि ४ जीबी डेटा मिळणार आहे. दरम्यान, २०९ आणि २२९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत अनलिमीटेड कॉलिंग आणि प्रति दिन १०० एसएमएस मिळणार आहेत. तर, २०९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज दीड जीबी आणि २२९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्रीपेड प्लान ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत वोडाफोनकडं दोन प्लान आहेत. २५५ आणि २९९ रुपयांचे दोन प्लान आहेत. २५५ रुपयांचे प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटीसोबत अनलिमीटेड कॉलिंग २.५ जीबी डेटा मिळणार आहे. तर, २९९ रुपयांच्या प्लानमध्ये ७० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमीटेड कॉलिंग, ३ जीबी डेटा आणि १००० एसएमएस मिळणार आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OMQMqb

Comments

clue frame