नवी दिल्ली: स्मार्टफोन उत्पादक कंपनी नोकिया आपला स्मार्ट टीव्ही आणत आहे हे वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. आता नोकियाने या टीव्हीच्या भारतातल्या लाँचिंगची अधिकृत तारीखच जाहीर केली आहे. भारतात नोकियाचा स्मार्ट टीव्ही ५ डिसेंबरला लाँच होणार आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवर एक्सक्लुझिव्ह पद्धतीने उपलब्ध होणार आहे. नोकियाच्या या स्मार्ट टीव्हीचं छायाचित्र अलीकडेच लीक झालं होतं. डॉल्बी टू सराउंड ऑडियो फ्लिपकार्टने या टीव्हीचे काही फिचर्स कन्फर्म केले आहेत. फ्लिपकार्टनुसार, या टीव्हीत मिनिमल हार्मोनिक डिस्टॉर्शन आणि चांगल्या दर्जेदार आवाजासाठी क्लिअर व्होकल टोन्स असतील. टीव्हीच्या वरच्या बाजुला उजवीकडे साउंड बाय जेबीएल असं लिहिलंय. क्वालिटी ऑडिओ प्लेबॅकसाठी टीव्हीत फ्रंट स्पीकर्समध्ये DTS TruSurroung आणि डॉल्बी ऑडिओ दिला आहे. फ्लिपकार्टने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे की नोकिया ब्रँड चा स्मार्ट टीव्ही खास स्पीकर्ससह येणार आहे आणि हे स्पीकर्स जेबीएल साउंड प्रोग्रामवर काम करणार आहेत. 'जेबीएल बाय हर्मन' ला बेस्ट ऑडिओ प्रोडक्ट्ससाठी ओळखले जाते. ५५ इंचांचा डिस्प्ले हा टीव्ही अलीकडेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सवर दिसला होता. BIS च्या डेटाबेसद्वारे याची खातरजमा होते की टीव्हीचा डिस्प्ले ५५ इंचांचा असून हा डिस्प्ले 4K अल्ट्रा HD सपोर्टसह येतो. या स्मार्ट टीव्हींसोबत टक्कर रिपोर्टनुसार, नोकियाचा स्मार्ट टीव्ही Android 9 वर आधारित बेस्ड प्रोप्रायटरी ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार आहे. सोबतच हा टीव्ही गुगल प्ले स्टोरच्या अॅक्सेससह येणार आहे. भारतीय बाजारपेठेत नोकियाचा मुकाबला शाओमीचा Mi TV, OnePlus TV आणि अलीकडेच लाँच झालेला Motorola TV शी होईल. नोकियाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत काय असेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XSCbOl
Comments
Post a Comment