नवी दिल्ली : एकेकाळी ओप्पोचा सबब्रँड असलेली कंपनी मिड रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या दमदार कामगिरी करत आहे. शाओमी आणि सॅमसंगलाही रियलमीकडून टक्कर दिली जात आहे. मात्र कंपनीचे सीईओ स्वतःच दुसऱ्या कंपनीचा फोन वापरत असल्याचं दिसून आलं. रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी नुकतंच आयफोनवरुन एक ट्वीट केलं, ज्यामुळे ते चांगलेच ट्रोल झाले. माधव सेठ हे कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. कंपनी आणि स्मार्टफोनविषयी ते ग्राहकांना अपडेट ठेवतात. शनिवारी माधव सेठ यांनी Realme ३ आणि Realme ३i ला मिळत असलेल्या OTA अपडेटच्या फीचरबाबत माहिती दिली होती. मात्र या ट्वीटखाली 'Twitter for iPhone' मार्किंग दिसली आणि माधव सेठ चांगलेच अडकले. एवढ्या मोठ्या ब्रँडचा सीईओ दुसऱ्या कंपनीचा फोन वापरत असल्याचं पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. दरम्यान, माधव सेठ यांच्या हँडलवरुन करण्यात आलेलं ट्वीट नंतर डिलीट केलेलंही पाहायला मिळालं. मात्र याचे स्क्रीनशॉट अजूनही दिसत आहेत. यावर सोमवारी माधव सेठ यांनी स्पष्टीकरणही दिलं. ‘गेल्या काही दिवसात मी अनेक फ्लॅगशिप फोन वापरले आहेत. Realme X२ Pro फक्त फास्ट चार्जिंग फ्लॅगशिप फोनच नाही, तर या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट फीचर असलेला फोन आहे’, असं ते म्हणाले. माधव सेठ यांच्या नव्या ट्वीटचा सरळ अर्थ होता, की ‘काही फ्लॅगशिप फोन’ फक्त वापरुन पाहिले. त्यामुळे स्वतःच्या ब्रँडवर विश्वास नाही का, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. कोणत्याही iOS डिव्हाइसवर ट्विटर वापरल्यानंतर इतर युझर्सलाही सिग्नेचर किंवा लेबल म्हणून हे ट्वीट आयफोनमधून करण्यात आल्याचं समजतं. ट्वीटच्या सर्वात खाली वेळ आणि तारखेनंतर आयफोन मार्किंग दिसते. माधव सेठ यांच्या बाबतीतही हेच झालं. दरम्यान, दुसऱ्या कंपनीचा फोन वापरणारे माधव सेठ हे पहिलेच व्यक्ती नाहीत. यापूर्वी वनप्लसचा चेहरा बनलेले रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांनीही प्रतिस्पर्धी कंपनीचा फोन Huawei P३० Pro वापरताना दिसले होते. पण आता वनप्लस ७ वापरण्याची वेळ आली असल्याचं नंतर ते म्हणाले होते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CVPfc4
Comments
Post a Comment