बीएसएनएलच्या 'या' प्लानमध्ये २ जीबी डेटा, ६० दिवस व्हॅलिटिडी

नवी दिल्लीः टेलिकॉम उद्योगक्षेत्रात कमी पैशात जास्त फायदे असलेले प्लान देण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. बीएसएनएलही आपल्या ग्राहकांसाठी ४जी कनेक्टिव्हीट सर्व्हिस अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर कंपनीनं ग्राहकांसाठी काही ऑफर्सही आणल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीनं दोन नवीन प्रीपेड प्लानची घोषणा केली आहे. यातील एक प्लान ९७ रुपये असून एका प्लानची किंमत ३६५ रुपये आहे. यात युजर्सना खास बेनिफिटही मिळणार आहेत. ९७ रुपयांचा प्लान बीएसएनएलचा ९७ रुपयांचा प्लान एसटीव्ही आहे. कमी बजेटमध्ये काही दिवसांसाठीच व्हॅलिटिडी हवी असणाऱ्या युजर्सससाठी हा बेस्ट प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्सना सर्व नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंगसाठी रोज २५० मिनिटं मिळणार आहेत. त्याचबरोबर रोज २ जीबी डेटा युजर्ससाठी देण्यात येणार आहे. या प्लानची व्हॅलिटिडी १८ दिवसांसाठी आहे. वाचाः ३६५ रुपयांचा नवा प्लान बीएसएनएलनं ९७ रुपयांच्या एसटीव्ही प्लानबररोबर ३६५ रुपयांचा आणखी एक प्लान लाँच केला आहे. या प्लान जास्त डेटा वापरणाऱ्या व जास्त व्हॅलिटिडी हवी असणाऱ्या युजर्ससाठी आहे. या प्लानमध्ये दररोज २५० मिनिटं व्हॉइस कॉलिंगसाठी मिळणार आहेत. तसंच, ६० दिवसांसाठी २ जीबी मोबाइल डेटा मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिटिडी ३६५ दिवसांसाठी असली तरी ग्राहकांना फक्त ६० दिवसांसाठीच इंटरनेट डेटा वापरता येणार आहे. दोन्ही नवीन प्लान सध्या तामिळनाडू, केरळ, चेन्नईतील सबस्क्राइबर्ससाठी लाँच केले आहेत. तसंच, युजर्सना जास्त किंमतीच्या रिचार्जवर दोन महिन्यांसाठी अधिक व्हॅलिटिडी मिळणार आहे. युजर्सना १,६९९ रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लान घेतल्यानंतर दोन महिन्यांची अधिक व्हॅलिटिडी मिळणार आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NLiWTr

Comments

clue frame