नवी दिल्ली: बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये उडालेल्या हवाई धुमश्चक्रीदरम्यान शत्रूला सळो की पळो करून सोडणारे भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्यावर आलेल्या व्हिडिओ गेमवर 'गुगल' फिदा झाले आहे. २०१९ चा बेस्ट गेम म्हणून गुगलनं या गेमची शिफारस केली आहे. 'इंडियन एअर फोर्स: अ कट अबॉव्ह' असं या गेमचं नाव आहे. गुगलनं 'युजर्स चॉइस गेम' विभागांतर्गत या गेमची पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. पहिल्यावहिल्या गेमला मिळालेल्या या प्रतिसादामुळं भारतीय हवाई दलानं आनंद व्यक्त केला आहे. हवाई दलानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या गेमला मत देण्याचं आवाहन केलं आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस हा गेम लाँच करण्यात आला होता. भारतीय युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी व त्यांना हवाई दलाकडं आकर्षित करण्याच्या उद्देशानं हा गेम बनविण्यात आला होता. 'मी एक योद्धा आहे, मला गर्व आहे, मी कोणालाही न घाबरणारा आहे' अशा टॅगलाइनचा वापर करत या गेमच्या ट्रेलरमध्ये करण्यात आला होता. एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या हस्ते गेम लाँच करण्यात आला होता. या खेळातील वैमानिकाची प्रतिकृती ही विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्यासारखी दिसते. तसंच, भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील विमानांसारख्या दिसणाऱ्या प्रतिकृती झळकतात. मोबाइल युजरना या खेळामध्ये 'सर्जिकल स्ट्राइक' करून शत्रूच्या प्रदेशात जाऊन त्यांना घेरायचे असते. भारतीय हवाई दलातर्फे हाती घेण्यात येणाऱ्या युद्ध मोहिमांचा थरारक अनुभव या गेमच्या माध्यमातून युजर्सना मिळतो. तसंच, हवाई दलाच्या युद्ध नीतीची माहिती देखील यातून मिळते. आपण स्वत: लढाऊ विमानांचे पायलट असल्याचा भास हा खेळ खेळणाऱ्यांना होतो. १० लाखांहून अधिक वेळा डाउनलोड हा गेम लाँच होऊन अवघे काही महिने झाले आहेत.मात्र, युजर्सना या थरारक गेमनं वेड लावलं आहे. प्ले स्टोअरवर आतापर्यंत १० लाखांहून अधिक वेळा हा गेम डाउनलोड करण्यात आला आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35e48lT
Comments
Post a Comment