नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी विवोला भारतात पाच वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विवोच्या स्मार्टफोनवर ग्राहकांना भरघोस सूट देण्यात येत आहे. झेड१ प्रो, वी१७ प्रो ते विवो वाय१२ पर्यंतच्या स्मार्टफोनवर ऑफर्स मिळणार आहेत. १२ नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा सेल ३० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना या ऑफरचा फायदा ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही पद्धतीनं घेता येणार आहे. फोनवर मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफरबरोबरच कंपनी नो-कॉस्ट इएमआय आण एक्सचेंज ऑफरही देत आहे. त्याचबरोबर १० टक्के कॅशबॅक ऑफर देण्यासाठी कंपनीनं एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकसोबत भागीदारी केली आहे. इतकंच नव्हेतर, काही निवडक स्मार्टफोनबरोबरच ब्लूटूथ हेडफोन, इअरफोन आणि नेकहेड मोफत देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनवर सूट कंपनी स्मार्टफोनच्या मूळ किमतीपेक्षा २१ हजार रुपयांनी स्वस्त विक्री करत आहे. या सेलअतर्गंत सगळ्यात भरघोस सूट विवो एक्स२१ या स्मार्टफोनवर मिळत आहे. या फोनची मूळ किमत ३६,९९० रुपये असून कंपनीच्या ऑफरमध्ये १५,९९० रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर, विवो व्ही१५ प्रोचा ६ जीबी+१२८ जीबी व्हेरियंट २१,९९० रुपयांमध्ये ग्राहक खरेदी करू शकतात. या फोनची मूळ किमत ३२,९९० रुपये आहे. या सेलमध्ये अन्य काही स्मार्टफोनवर ३ हजारांपर्यंत सूट देण्यात आली आहे. विवो वाय१५ची किमत १२,९९० रुपयांनी कमी करून ११,९९० रुपये केली आहे. कंपनीनं विवो झेड१ प्रो, विवो व्ही१७ प्रो, विवो व्ही १५ प्रो आणि विवो एस १ आणि विवो झेड एक्स या स्मार्टफोनवर प्रीपेड डिस्काउंट दिलं आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2qGEgQO
Comments
Post a Comment