जिओचे बेस्ट प्रीपेड प्लान; रोज मिळणार २जीबी डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स आपल्या सब्सक्रायबर्ससाठी नेहमी नवनवीन ऑफर्स घेऊन येत असतात. जिओच्या डेटा प्लानमुळं दूरसंचार क्षेत्रात कंपनीनं प्रगती केली आहे. जास्त डेटा देणारे प्लान युजर्सना अधिक आकर्षित करतात हे समीकरण लक्षात घेऊन कंपनीनं जास्त डेटा देणारे प्लान आणले आहेत. जाणून घेऊयात अधिक डेटा देणारे जिओचे टॉप-५ प्लान जिओचा ४४४ रुपयांचा ऑल-इन-प्लान जिओनं अलीकडेच हा प्लान लाँच केला आहे. आययूसी लागू केल्यानंतर ग्राहकांसाठी हा प्लान उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट ग्राहकांना नक्कीच पसंत पडतील. रोज दोन जीबी डेटा आणि ८४ दिवसांच्या व्हॅलिटीडीसह जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग आहे. तसंच, दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी प्लानमध्ये १००० आययूसी मिनिटं देण्यात आले आहेत. १०० फ्री मेसेजसुद्धा प्लानमध्ये देण्यात आले आहेत. पेटीएमनं हा प्लान रिचार्ज केल्यानंतर युजर्सना ४४ रुपयांचे डिस्काउंट देण्यात येत आहे. जिओचा २९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये ३ जीबी डेटा ऑफर देण्यात आली आहे. प्लानची व्हॅलिटिडी २८ दिवसांची आहे. जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळणार आहे. मात्र, दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आययूसी टॉप-अप करावं लागणार आहे. आययूसी टॉप-अप व्हाउचर १० रुपयांपासून सुरू होते. जिओचा ३९९ रुपयांचा प्लान ८४ दिवसांचा व्हॅलिटिडीसह मिळणाऱ्या या प्लानमध्ये युजर्सना रोज १.५जीबी डेटा दिला आहे. यासोबतच प्लानमध्ये जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग फ्री आहे. दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आययूसी टॉप-अप करावं लागणार आहे. जिओचा ४९८ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये ९१ दिवसांची व्हॅलिटीडी मिळणार आहे. तसंच, रोज दोन जीबी डेटा आणि १०० फ्री मेसेजची सुविधाही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. जिओचा १,६९९ रुपयांचा प्लान तुम्ही दीर्घकाळासाठी एखाद्या प्लानचा विचार करत असाल तर जिओचा हा प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहे. ३६५ दिवसांच्या व्हॅलिटीडीसह येणाऱ्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे. इतर प्लानप्रमाणे यातही ग्राहकांना १०० फ्री सेमेज आणि जिओ नेटवर्कसाठी फ्री कॉलिंगची सुविधा आहे. मात्र, दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आययूसी रिचार्ज करावा लागणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OnH51x

Comments

clue frame