गुगल आता बोलायलाही शिकवणार; नवं फिचर आलं

नवी दिल्ली: तुमचे अस्पष्ट आहेत...? तुम्हाला काही शब्द बोलताना अडखळायला होतं...? तुम्ही बोललेलं समोरच्याला कळत नाही...? तुम्हाला अशा काही अडचणींना सामोरे जावं लागत असेल तर काही निराश होऊ नका. दुनियाभरची माहिती देणारं सर्च इंजिन '' तुम्हाला आता बोलायलाही शिकवणार आहे. त्यासाठी गुगलने नवं फिचर आणलं आहे. गुगलने गुगल सर्चसाठी नवं फिचर आणलं आहे. या फिचरसाठी गुगलने मशीन लर्निंगचा वापर केला आहे. या फिचरद्वारे तुम्हाला उच्चार कसा करायचा हे शिकवलं जाणार आहे. या आधी गुगलमध्ये एखाद्या शब्द ऐकायला मिळायचा. पण त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगितलं जात नसायचं. आता गुगलचे 'स्पीच रिकॉग्निशन टूल' तुमच्या बोलल्या गेलेल्या शब्दांना प्रोसेस करेल. तुमचे उच्चार एक्सपर्ट्सच्या उच्चारांशी मॅच केले जातील आणि तुम्हाला योग्य उच्चार कसा करायचा हे शिकवलं जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करायचा याची या फिचरद्वारे पडताळणी केली जाते. त्यामुळे योग्य उच्चार कसा करायचा हे शिकवलं जातं. योग्य उच्चार कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी गुगलने '' हे फिचर उपलब्ध करून दिलं आहे. तुम्हाला एखादा शब्द उच्चारता येत नसेल, एखादा शब्द उच्चारताना तुम्ही अडखळत असाल तर गुगलवर तुम्हाला स्पीक नाऊचा पर्याय दिसेल. तिथे माइक आयकॉनवर टॅप करा आणि तुम्हाला कठिण वाटणारा शब्द उच्चारा. त्यानंतर तुम्हाला तुम्ही त्या शब्दाचा योग्य उच्चार केला की नाही, हे सांगितलं जाईल. तसेच तुम्ही कुठे चुकलात? काय बोलायला हवं होतं, कोणत्या शब्दावर जोर द्यायला हवा, कोणता शब्द अस्पष्ट बोललात याची सूचनाही तुम्हाला तिथेच मिळे. सध्या तरी इंग्रजी शब्दांसाठी हे फिचर उपलब्ध असेल. लवकरच इतर भाषांचा पर्यायही या फिचरमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं गुगलने म्हटलं आहे. प्रायोगिकतत्त्वावर हे फिचर उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सध्या तरी हे फिचर केवळ मोबाईलमध्येच असेल. हे फिचर्स अजून अॅडव्हान्स करण्यात येणार असून त्यात आणखी काही नवे पर्याय दिले जाणार आहेत. गुगलने या फिचरसोबत वर्ड ट्रान्सलेशन आणि डेफिनेशनमध्ये काही बदल केले आहेत. म्हणजे तुम्ही जर एखादा शब्द भाषांतरीत केला तर गुगल तुम्हाला त्या शब्दाशी संबंधित चित्र दाखवतो. हे फिचरसुद्धा सध्या इंग्रजी भाषांतरापर्यंतच मर्यादित आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Koug5R

Comments

clue frame