मोबाइल इंटरनेट महागणार; युजर्ससाठी क्यू प्लानचा पर्याय

नवी दिल्लीः एयरटेल, जिओ, वोडाफोन-आयडियानं मोबाइल डेटाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. येत्या १ डिसेंबरपासून वोडाफोन- आयडिया आणि एअरटेलचे नवे दर लागू होणार आहेत. कंपन्या १५ ते २० टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याची शक्यता आहे. तसंच, युजर्ससाठी कंपनीनं आणखी काही नवीन प्लान लाँच करण्याच्या प्रयत्नात आहेत. वाढलेल्या दरांचा फटका बसू नये म्हणून युजर्स प्रीपेड प्लान क्यू करू शकतात. क्यू म्हणजे युजर्स त्यांच्या सध्याच्या प्रीपेड प्लानची व्हॅलिटीडी संपण्याच्या काही दिवस आधी दुसऱ्या प्लानची निवड करु शकतात. जेणेकरून प्रीपेड प्लानची व्हॅलिटीडी संपल्यानंतर लगेचच दुसरा प्लान अॅक्टिवेट होईल. या प्लानचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे युजर्स एकाचवेळी अनेक प्लान क्यू करू शकतात. रिलायन्स जिओनं क्यूची ट्रेन्ड सगळ्यात आधी सुरु केला होता. आता एअरटेलनंही हाच ट्रेन्ड फॉलो केला आहे. वाचाः अधिक कालावधीसाठी प्लान क्यू करू शकतात दर वाढवल्यानंतर एअरटेलला रिचार्ज करण्यासाठी आता अधिक पैसे खर्च करावे लागणार. कंपनी साधारण २० टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याची शक्यता आहे. अशावेळी १९९ रुपयांचा प्रीपेड प्लानची किंमत २१९ होण्याची शक्यता आहे. युजर्ससाठी डेटा प्लान क्यू करण्याची सुविधा देत आहे. सध्याच्या सुरू असलेला एअरटेल प्लान दोन दिवसांत संपणार आहे. मात्र, तुम्हाला हाच प्लान त्यानंतरही सुरुच ठेवायचा असल्यास तुम्ही त्याच नंबरवर प्लान क्यू करू शकता. असं केल्यास जुना प्लान संपल्यानंतर लगेचच दुसरा प्लान अॅक्टिवेट होईल. एअरटेल युजर्स १,६९९ रुपयांचा लाँग टर्म प्लानही क्यू करु शकतात. कॉम्बो प्लानसाठी ऑफर एअरटेलची ही ऑफर फक्त कॉम्बो प्लानसाठी आहे. म्हणजेच एखाद्या युजरचा प्लान २४५ रुपयांचा स्मार्ट रिचार्ज प्लान असेल तर तुम्ही कोणताही अनलिमीटेड कॉम्बो प्लान क्यू करू शकत नाही.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34hIMEj

Comments

clue frame