बीएसएनएलला एअरटेलने दिली डिस्कनेक्शनची धमकी

कोलकाता: भारत संचार निगम लिमिटेड () ने दूरसंचार विभागाकडे भारती एअरटेलविरोधात तक्रार दाखल केली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या म्हणण्यानुसार, सुनील मित्तल यांच्या कंपनीने त्यांना धमकी दिली आहे की जर बीएसएनएलने टाटा टेलिसर्व्हिसेस आणि भारती या कंपन्यांना विलीन झालेल्या म्हणजेच एक कंपनी मानलं नाही तर एअरटेल बीएसएनएलच्या ग्राहकांचे फोन डिस्कनेक्ट करेल. बीएसएनएलने दूरसंचार विभागाला २१ नोव्हेंबरला यासंदर्भातील पत्र लिहिले आहे. त्यात असं म्हटलंय की एअरटेलने टेलिकॉम लवादाच्या एका आदेशाला मर्जरअंतर्गत व्यवहार सुरू करण्याचा आधार मानले. 'रुटमध्ये बदल करा अन्यथा बीएसएनएलच्या ग्राहकांचा फोन न लागल्यास त्याला कंपनी स्वत:च जबाबदार असेल,'असंही पत्रात म्हटलंय. भारती एअरटेल आणि भारती हेक्साकॉममध्ये टाटा टेलिसर्व्हिसेसच्या मोबिलिटी बिझनेसच्या झालेल्या विलीनीकरणाची अद्याप दूरसंचार विभागाने आपल्या दफ्तरी नोंद केलेली नाही. परिणामी या प्रकरणी बीएसएनएलने सरकारकडून निर्देश मागितले आहेत. दूरसंचार विभागाने याच महिन्यात TDSAT च्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. TDSAT ने दूरसंचार विभागाला एअरटेल आणि टाटा टेलिसर्व्हिसेसच्या कन्झ्युमर मोबिलिटीच्या विलीनीकरण कराराला मान्यता देणं बंधनकारक केलं होतं. दूरसंचार विभागाने या प्रकरणी आठ हजार कोटी रुपयांच्या वन टाइम स्पेक्ट्रम शुल्काची मागणी केली आहे. आपणास या मर्जरविषयीची कोणतीही माहिती नाही असं बीएसएनएलचं म्हणणं आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2qQX1RR

Comments

clue frame