फेसबुक, ट्विटर युजर्सचा डेटा लीक; हे अॅप्स करत होते डेटा चोरी

नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आणि युजर्सचा डेटा लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ट्विटर आणि फेसबुकनंही लाखो युजर्सचा डेटा चुकीच्या पद्धतीनं अॅक्सेस केला असल्याचं मान्य केलं आहे. डेटाची चोरी गुगल प्लेवरील काही थर्ड पार्टी अॅप्स करत असल्याचं समोर आलं आहे. ज्या युजर्सनं या अॅपवर लॉगीन केलं आहे त्यांचं अधिक नुकसान झाल्याचं कळतं आहे. ई-मेल अॅड्रेस आणि युजरनेम केलं अॅक्सेस सिक्युरिटी रिसर्चच्या अहवालानुसार, वन ऑडियन्स आणि मोबीबर्न सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट युजर्सच्या डेटाचा अॅक्सेस देत होते. यात ई-मेल अॅड्रेस, युजरनेम आणि लेटेस्ट ट्वीट्सचा अॅक्सेस दिला आहे. ज्या युजर्सचा डेटा अॅक्सेस अॅप्सना दिला आहे त्यांना नोटिफिकेशनद्वारे सूचीत करणार असल्याचं फेसबुक आणि ट्विटरकडून सांगण्यात येत आहे. फेसबुककडून अॅप्स बॅन फेसबुकनंही डेटा चोरीची पडताळणी केल्यानंतर या या अॅप्सवर बॅन लावण्यात आले आहे. फेसबुकच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे अॅप्स हटवण्यात आले आहे. तसंच, फेसबुक युजर्सना डेटा लीकची माहिती देणार असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे. आयओएस युजर्स सेफ डेटा चोरीप्रकरणी आयओएस युजर्सना कोणताही धोका नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. ट्विटरनं याची माहिती गुगल आणि अॅपलला दिली आहे. जेणेकरून गुगल आणि अॅपल मॉलिशेस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटविरोधात उपाययोजना करु शकतील.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OOzObf

Comments

clue frame