व्होडाफोन-आयडियाच नव्हे, जिओचाही ग्राहकांना 'शॉक'

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात अल्पावधीतच शिखर गाठलेली कंपनी रिलायन्स जिओकडूनही टेरिफ प्लान्स महाग केले जाणार आहेत. येत्या काही दिवसात दर वाढवले जाणार असल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं. दूरसंचार क्षेत्रात सतत होत असलेल्या सततच्या तोट्यामुळे जिओने गेल्या काही दिवसात इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी विविध आययूसी व्हाऊचर्स आणले आहेत. आता टेरिफ प्लान्सही महागणार आहेत. यापूर्वी एअरटेल, व्होडाफोन-आयडियानेही टेरिफ प्लान महाग करणार असल्याचं जाहीर केलं आहे. रिलायन्स जिओचा ग्राहक वर्ग मोठा असला तरी कंपनीला आर्थिक झळ बसत आहे. मार्केटमधील परफॉर्मन्स दर्शवणाऱ्या प्रति ग्राहक सरासरी महसुलात जिओ व्होडाफोन-आयडियाच्याही मागे आहे. सप्टेंबर महिन्यातही जिओचा प्रति ग्राहक महसूल ३ टक्क्यांनी घटून ११८ रुपये झाला होता. या पार्श्वभूमीवर जिओने एअरटेल, व्होडाफोन-आयडियाच्याच पावलावर पाऊल टाकलं आहे. जिओ नेटवर्कवर आऊटगोईंग आणि इनकमिंग कॉल्सचं प्रमाण इतरांच्या संख्येने जास्त आहे. एप्रिल २०१७ मध्ये आययूसी लागू झाल्यानंतर जिओकडे आऊटगोईंग ९० टक्के आणि इनकमिंगची संख्या केवळ १० टक्के होती. त्यामुळेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय BAK लागू करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ ची डेडलाईन निश्चित करावी लागली. आययूसी शुल्कानेही या क्षेत्रात स्थैर्य आलं नाही. परिणामी टेरिफ प्लान महागणार आहेत. ट्राय आययूसी बंद करण्याच्या विचारात आहे आणि यासाठीची तारीखही जवळ येत आहे. त्यामुळे आययूसी बंद करण्याची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी एअरटेलकडून करण्यात आली होती. अगोदर जानेवारी २०२० ही डेडलाईन ठेवण्यात आली होती. जिओ हे शुल्क संपवण्याच्या बाजूने आहे, पण वेळेत आययूसी शुल्क न संपल्यामुळे जिओला आपल्या ग्राहकांवर हे शुल्क आकारावं लागलं, ज्यामुळे इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आता पैसे लागत आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37k5Gg2

Comments

clue frame