व्हॉट्सअॅपचे नवे फिचर; अनेक ठिकाणी लॉग इन करता येणार

नवी दिल्ली: इन्स्टंट अॅप whatsapp आता मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट फिचरवर काम करत आहे. फेसबुक या व्हॉट्सअपचे मालकी हक्क असलेल्या कंपनीने या दिशेने पाऊक उचलत आयफोन यूजर्ससाठी रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन फिचर सुरू केलं आहे. सध्या आपण केवळ एकाच डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअप लॉग इन करू शकतो. आता ते एका वेळी अनेक डिव्हाइसमध्ये लॉग इन करता येणार आहे. रजिस्टर नोटिफिकेशन फिचर काय आहे? नावाप्रमाणेच या फिचरद्वारे यूजरला अलर्ट केलं जाणार आहे. जर कोणी अन्य व्यक्ती तुमच्या अकाउंटमधून लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा अलर्ट तुम्हाला मिळेल. हे प्रायव्हसी फिचर सध्या केवळ iOS यूजर्ससाठीच आहे. जर कोणी व्यक्ती आपलं अकाउंट लॉग इन करण्याच प्रयत्न करत असेल तर whatsapp वर तुम्हाला अलर्ट पाठवेल, ज्यात लिहिलं असेल की, 'तुमच्या फोन नंबरसाठी व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड रिक्वेस्ट आली आहे.' नव्या फिचरमुळे एकाच वेळी एकच अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता येणार आहे. जसं तुम्ही सोशल मीडिया अकाउंट्स अनेक ठिकाणी वापरू शकता त्याच प्रकारे हे फिचर असेल. सध्या व्हॉट्सअॅप आपण एकाच वेळी एकाच अकाउंटमधून केवळ मोबाइल आणि डेस्कटॉपवर वापरू शकतो. मात्र यासाठी प्रायमरी डिव्हाइसला सातत्याने इंटरनेट कनेक्ट करण्याची आवश्यक असते आणि त्यानंतर केवळ त्या डिव्हाइसचे मेसेज वेब व्हर्जनवर दिसतात. सर्वाधिक पॉप्युलर मेसेजिंग अॅप व्ह़ॉट्स अॅप जगातील सर्वाधिक पॉप्युलर मेसेजिंग अॅपपैकी एक आहे. या अॅपवर जगातील १.५ अब्ज यूजर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर दररोज सहा कोटी मेसेज पाठवले जातात, असा कंपनीचा दावा आहे. या कंपनीला २०१४ मध्ये फेसबुकने टेकओव्हर केले होते. कंपनीने यानंतर याचं वेब व्हर्जन लाँच केलं होतं. यामुळे यूजर्सना आपल्या पर्सनल कॉम्प्युटरवर याचा वापर करू शकतात. याव्यतिरिक्तही एक अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता येण्याचा पर्याय यूजर्सला अद्याप मिळालेला नाही. आता यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KsS9sY

Comments

clue frame