आयफोन युझर्स फेसबुकच्या 'या' बगमुळे वैतागले

नवी दिल्ली : युझर्सची सुरक्षा आणि गोपनीयतेविषयी पुन्हा एकदा फेसबुकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. न्यूज फीडमध्ये स्क्रोल करत असताना बॅकग्राऊंडमध्ये कॅमेरा आपोआप सुरु होत असल्याची तक्रार जगभरातील युझर्स करत आहेत. कॅमेरा आपोआप का सुरु होत आहे याबाबत अनेक युझर्स विचार करत असतानाच फेसबुकमुळे हे होत असल्याचं समोर आलं. वाचा : जोशुआ मॅडक्स नावाच्या एका आयफोन युझरने या बगच्या बाबत तक्रार करत ट्वीट केलं. फेसबुकचा वापर करत असताना अत्यंत मोठ्या प्रमाणात कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे, अशी तक्रार या युझरने केली. हा बग फेसबुकच्या App मध्ये आढळला असून न्यूज फीड स्क्रोल करताना कॅमेरा आपोआप होत असल्याचा दावा मॅडक्सने केला. युझर्सला एका बगमुळे त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं फेसबुकनेही मान्य केलं आहे. कंपनीच्या इंटीग्रिटीचे उपाध्यक्ष गाय रॉजन यांनी यावर भाष्य केलं. हा एक बग असल्याचं दिसत असून कंपनी यावर काम करत आहे, असं ते म्हणाले. या बगकडे लक्ष वेधल्याबद्दल गाय रॉजन यांनी युझर्सचे आभारही मानले. वाचा : आपल्या App मध्ये बग असल्याचं काही वेळातच या दिग्गज कंपनीला मान्य करावं लागलं. iOS १३ वापरत असलेल्या युझर्सनाच या बगचा त्रास होत असल्याचंही रॉजन म्हणाले. ‘आयफोन फेसबुक App अचानक लँडस्केपमध्ये लाँच होत असल्याचं आढळून आलं आहे. गेल्या आठवड्यात हा बग फिक्स करत असतानाच चुकून दुसराच एक बग समोर आला, ज्यामुळे फोटोवर क्लिक केल्यानंतर थेट App आणि कॅमेरा स्क्रीनचा संबंध येतो. या बगमुळे कोणताही फोटो किंवा व्हिडीओ आपोआप अपलोड झाल्याचे अजून कोणतेही पुरावे कंपनीला मिळालेले नाहीत,’ असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XaBlfd

Comments

clue frame